सारा अली खान रेडी टू मिंगल, मात्र तिची अशाप्रकारे लग्न करण्याची आहे इच्छा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 15:59 IST2020-02-11T15:53:57+5:302020-02-11T15:59:18+5:30

सगळीकडे सध्या कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्याच जास्त चर्चा आहेत. तसेच त्यांच्यात मैत्रीच व्यतिरिक्त प्रेमाचेही नाते फुलत असल्याच्या चर्चा आहेत.

Sara ali khan Ready to Mingle, But has this one condition | सारा अली खान रेडी टू मिंगल, मात्र तिची अशाप्रकारे लग्न करण्याची आहे इच्छा !

सारा अली खान रेडी टू मिंगल, मात्र तिची अशाप्रकारे लग्न करण्याची आहे इच्छा !

सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. या सगळ्या गोष्टी पाहून अभिनेत्री सारा अली खानलाही लग्नाचे वेध लागले आहेत.तसेच ती कार्तिक आर्यनच्या प्रेमात असल्याच्या चर्चा रंगत असतात त्यामुळे प्रेमात आकंत बुडाल्यानेही साराला लग्न कारायची इच्छा झाली असावी. म्हणून तिने तिच्या एका मुलाखतीत तिचा वेडींग प्लॅन सांगितला आहे.


तिने सांगितले की, मी रॉयल फॅमिलीत जन्माला आले असले तरीही मला लग्न मात्र अत्यंत साध्या पद्धतीनं करायचं आहे. साराच्या या उत्तरानं सर्वांची मनं जिंकली आहेत. सारा कितीही मोठी स्टार झाली असली तरीही तिचे पाय अद्यापही जमिनीवर असल्याचं तिच्या या उत्तरातून पुन्हा एकदा स्पष्ट झालं. इतर वेळीही बाकीच्या नवोदित अभिनेत्रींच्या तुलनेत सारा पॅपराजींसोबत नम्रतेने वागताना दिसते. आपुलकीनं त्यांची चौकशी करताना दिसते. भविष्यात एखादा चांगला मुलगा कुणी आयुष्यात आला तर लग्न करु असंही तिने सांगितले आहे. सध्या तरी आपण सिंगल आहोत हे सांगायलाही ती विसरली नाही. 

तसेच कार्तिक आणि सारा सिनेमाच्या शूटिंगमधून वेळात वेळ काढून दोघे एकत्र वेळ एन्जॉय करायचे. तसेच कार्तिक साराबाबत जरा जास्तच पझेसिव्ह असल्याचंही वेळोवेळी पाहायला मिळालं. सध्या दोघेही 'लव्ह आजकल' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ते प्रमोशन करताना पाहायला मिळतायेत.

Web Title: Sara ali khan Ready to Mingle, But has this one condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.