अमरनाथ यात्रेनंतर सारा अली खान पोहोचली दर्ग्यात, म्हणाली, 'शांतता सगळीकडेच फक्त...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 12:19 PM2023-07-25T12:19:15+5:302023-07-25T12:19:59+5:30

सारा अली खान सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

sara ali khan photo outside dargah after completing amarnath yatra says peace is everywhere look within | अमरनाथ यात्रेनंतर सारा अली खान पोहोचली दर्ग्यात, म्हणाली, 'शांतता सगळीकडेच फक्त...'

अमरनाथ यात्रेनंतर सारा अली खान पोहोचली दर्ग्यात, म्हणाली, 'शांतता सगळीकडेच फक्त...'

googlenewsNext

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) नेहमी तिच्या हटके व्हिडिओमुळे चर्चेत असते. तसंच ती मोठी शिवभक्त असून केदारनाथ यात्रा, ज्योतिर्लिंगांचे दर्शन करतानाचे व्हिडिओही शेअर करत असते. नुकताच साराचा अमरनाथ यात्रेदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर आता साराचा दर्ग्यातील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सारा अली खान सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. अमरनाथ यात्रेत स्थानिक लोकांसोबत वेळ घालवतानाचे काही क्षण तिने कॅमेऱ्यात कैद केले. 'नमस्ते दर्शको' असं म्हणत ती आपल्या हटके स्टाईलने चाहत्यांचं मनोरंजन करत असते. एका स्थानिक महिलेसोबत आणि तिच्या मुलांसोबत सारा वेळ घालवताना दिसते. यात ती महिला बकरीचं ताजं दूध काढून सारासाठी चहा बनवते. हे सर्व क्षण साराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले. साराच्या या व्हिडिओला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत आहे.

याशिवाय साराचा दर्ग्याबाहेरचा एक फोटोही व्हायरल होतोय. 'आपल्याला कुठे शांतता अनुभवायला मिळेल? तर स्वत:च्या मनात झाका सगळीकडेच शांतता आहे.' असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे.

साराच्या या साधेपणावर चाहतेही फिदा झालेत. 'लक्झरी लाईफस्टाईलची कमी नसताना ती सामान्य लोकांमध्ये जात आयुष्य जगते. तिच्या साधेपणाने मन जिंकलंय' अशी कमेंट एका युझरने केली आहे. तर 'या पिढीला तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. तुझ्यासारखे खूप कमी लोक जगात आहेत', 'कोणताच दिखावा नाही ही खूपच डाऊन टू अर्थ आहे' असं म्हणत एकाने तिचं कौतुक केलंय.

साराचा नुकताच 'जरा हटके जरा बचके' सिनेमा रिलीज झाला. बॉक्सऑफिसवर सिनेमाने बऱ्यापैकी कमाई केली. तसंच साराच्या अभिनयाचंही कौतुक झालं. आता ती अनुराग बासूच्या 'इन दिनो' सिनेमात दिसणार आहे. तसंच 'ऐ वतन मेरे वतन' सिनेमातही तिची मुख्य भूमिका आहे.

Web Title: sara ali khan photo outside dargah after completing amarnath yatra says peace is everywhere look within

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.