सारा अली खानने केले ग्लॅमरस फोटोशूट; पण कौतुकाऐवजी अशी झाली ट्रोल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 15:57 IST2019-02-27T15:56:36+5:302019-02-27T15:57:20+5:30

सैफ अली खानची लेक सारा अली खानचा बॉलिवूड डेब्यू झाला आणि आता सारा फिल्मफेअरच्या मॅगझिनवरही झळकली. साराने नुकतेच या मॅगझिनसाठी फोटोशूट केले. या फोटोशूटचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअरही केलेत. पण हे काय?

sara ali khan filmfare magazine photoshoot fans trolled | सारा अली खानने केले ग्लॅमरस फोटोशूट; पण कौतुकाऐवजी अशी झाली ट्रोल!!

सारा अली खानने केले ग्लॅमरस फोटोशूट; पण कौतुकाऐवजी अशी झाली ट्रोल!!

ठळक मुद्देआफ्रिकन व्यक्तिला एका वस्तूप्रमाणे वापरून त्याच्या संस्कृतीचा अपमान केल्याची टीकाही काहींनी केली आहे.

सैफ अली खानची लेक सारा अली खानचा बॉलिवूड डेब्यू झाला आणि आता सारा फिल्मफेअरच्या मॅगझिनवरही झळकली. साराने नुकतेच या मॅगझिनसाठी फोटोशूट केले. या फोटोशूटचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअरही केलेत. पण हे काय? साराचा फोटोशूटमधील ग्लॅमरस अंदाज लोकांना जराही भावला नाही. या फोटोशूटनंतर चाहत्यांकडून कौतुकाचे दोन शब्द ऐकण्याऐवजी सारा ट्रोल झाली. आता याचे कारण काय, तर साराच्या मागे उभा असलेला आफ्रिकन पुरूष.




होय, साराच्या फोटोशूटच्या एका फोटोत तिच्यामागे एक आफ्रिकन व्यक्ती उभा आहे. फोटोतील साराच्या अदा वेड लावणाºया आहेत. उंचपु-या आफ्रिकन व्यक्तिसोबत साराने अतिशय आत्मविश्वासाने पोज दिली आहे. पण या फोटोत एक घोळ आहे. हा घोळ साराला दिसला नाही. पण नेटक-यांनी मात्र तो नेमका ओळखला. होय, या फोटोत साराची सावली दिसतेय. पण तिच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तिची सावली मात्र नाही. नेमकी हीच गोष्ट युजर्सला खटकली आणि त्यांनी साराला ट्रोल केले.







हा फोटो फोटोशॉप्ड असल्याचा दावा युजर्सनी केला. लोकांनी केवळ एकट्या सारालाच ट्रोल केले नाही तर त्यांनी संबंधित मॅगझिनलाही फैलावर घेतले. इतकी खराब एडिटींग करायची होती, तर आम्हीच करून दिली असती, असे एका युजरने लिहिले. आफ्रिकन व्यक्तिला एका वस्तूप्रमाणे वापरून त्याच्या संस्कृतीचा अपमान केल्याची टीकाही काहींनी केली आहे.
एकंदर काय तर सोशल मीडियावरच्या युजर्सच्या नजरेतून काहीही सुटणारे नाही. या ताज्या फोटोशूटवरून साराला हे चांगलेच कळले असावे.

Web Title: sara ali khan filmfare magazine photoshoot fans trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.