सारा अली खानचं गजब टॅलेन्ट; पाहा, 30 सेकंदात 15 वेगवेगळे एक्सप्रेशन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 11:01 AM2021-07-18T11:01:12+5:302021-07-18T11:01:32+5:30

Sara Ali Khan : साराने एक व्हिडीओ शेअर केला आहे. होय, या इमोजी व्हिडीओमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

sara ali khan emoji facial expresssion shares cute video | सारा अली खानचं गजब टॅलेन्ट; पाहा, 30 सेकंदात 15 वेगवेगळे एक्सप्रेशन!!

सारा अली खानचं गजब टॅलेन्ट; पाहा, 30 सेकंदात 15 वेगवेगळे एक्सप्रेशन!!

googlenewsNext
ठळक मुद्देलवकरच सारा ‘अतरंगी रे’ या चित्रपटात झळकणार आहे. यात अभिनेता अक्षय कुमार व धनुष मुख्य भूमिकेत आहेत.  

सारा अली खानने  (Sara Ali Khan) फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. सोशल मीडियावर सारा प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. तिचे फनी व्हिडीओ पाहणे म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असते. आता साराने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. होय, या इमोजी व्हिडीओमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. काल 17 जुलैला वर्ल्ड इमोजी डेच्या निमित्ताने तिने हा व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ क्षणात व्हायाल झाला आहे. या व्हिडीओत साराचे गजब टॅलेन्ट पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओत 30 सेकंदात साराने  15 वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन दिले आहेत.

विविध इमोजींच्या हावभावाची नक्कल करताना दिसत आहे. हा विनोदी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो चाहत्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया  दिल्या आहेत.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, 2018 साली ‘केदारनाथ’ या सिनेमातून तिने डेब्यू केला होता. त्यानंतर त्याच वर्षी तिचा रणवीर सिंगसोबत ‘सिम्बा’हा चित्रपट रिलीज झाला होता. 2020 मध्ये साराचे दोन सिनेमे प्रदर्शित झाले होते. कार्तिक आर्यनसोबत ‘लव्ह आज कल’ आणि वरूण धवनसोबत ह्यकुली नंबर 1ह्णमध्ये ती दिसली होती. लवकरच सारा ‘अतरंगी रे’ या चित्रपटात झळकणार आहे. यात अभिनेता अक्षय कुमार व धनुष मुख्य भूमिकेत आहेत.
 

 

Web Title: sara ali khan emoji facial expresssion shares cute video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.