बेबी बम्पसह 'सैफिना'चा राजेशाही फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 20:55 IST2016-11-10T20:55:18+5:302016-11-10T20:55:18+5:30
घरी नवा पाहुणा येणार असल्याने करिना कपूर व सैफ अली खान सध्या जाम खूश आहेत. करिना कपूर आपल्या प्रेगनेंसीला ...

बेबी बम्पसह 'सैफिना'चा राजेशाही फोटोशूट
करिना कपूर खान प्रेग्नेंट झाल्यापासून बॉलिवूडमध्ये तिने नवीन प्रेग्नेंसी ट्रेन्डचा आणला आहे. अनेक कंपन्या तिच्या प्रेग्नेंसीचा आधार घेऊन ब्रँडिंगचा प्रयत्न करीत होत्या. मात्र, फोटोसेशन करून चांगलीच चर्चा मिळविली. मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या वस्त्रांचे ‘हॅलो’ मॅगझिनसाठी केलेले फोटोसेशन चांगलेच चर्चेत होते. त्यानंतर तिने एका फॅशन शोसाठी रॅम्पवॉकही केला. आता पुन्हा एकदा फ ोटोसेशनच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसमोर आली आहे. यावेळी तिच्यासोबत सैफ अली खानही दिसतोय.
‘हार्पर बाझार’ या मॅगझिनच्या नोव्हेंबर 2016 च्या ‘ब्राईड’अंकासाठी सैफ अली खान व करिना कपूर यांनी फोटोसेशन केले आहे. यात दोघांचा लूक राजेशाही थाटातला दिसतो. मासिकाच्या कव्हवरपेजवर सैफ व करिना यांचा फोटो असून ‘ट्रू रॉयल्स’ असे लिहले आहे. कव्हरपेजच्या फोटोमध्ये करिनाने आपले बेबीबम्प लपविले असून एका अन्य फोटोत तिचे बेबी बम्प दिसत आहेत. यासोबतच दोघांचे अनेक फोटो यात दिसत आहेत.
या फोटोसेशनसाठी त्यांनी साब्यासाची मुखर्जी, अनामिका खन्ना, रोहीत बल यांच्यासह अनेक डिझायनर्सनी तयार केलेले वस्त्र परिधान केले आहेत. यात सैफचा लूक नवाबी थाटात तर करिना बेगमच्या लूकमध्ये झक्कास दिसतेय.