​संजय लीला भन्साळींना भेटण्यासाठी नाही तर ‘या’ कारणासाठी ‘त्या’ बिल्डिंगमध्ये गेली होती जान्हवी कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 12:38 IST2018-04-03T07:08:10+5:302018-04-03T12:38:10+5:30

श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर अलीकडे संजय लीला भन्साळींच्या आॅफिसबाहेर दिसली होती. यानंतर जान्हवी भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, ...

Sanjay Leela did not meet Bhansali, but for 'this' reason, he went to the building Jhanvi Kapoor! | ​संजय लीला भन्साळींना भेटण्यासाठी नाही तर ‘या’ कारणासाठी ‘त्या’ बिल्डिंगमध्ये गेली होती जान्हवी कपूर!

​संजय लीला भन्साळींना भेटण्यासाठी नाही तर ‘या’ कारणासाठी ‘त्या’ बिल्डिंगमध्ये गेली होती जान्हवी कपूर!

रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर अलीकडे संजय लीला भन्साळींच्या आॅफिसबाहेर दिसली होती. यानंतर जान्हवी भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, या चर्चेला जोर चढला होता. भन्साळी एक ऐतिहासिक चित्रपट बनवत असून यात त्यांना जान्हवी हवी आहे, अशीही चर्चा होती. करिअरच्या अगदी सुरुवातीला भन्साळींचा चित्रपट आॅफर व्हावा  म्हटल्यावर सगळ्यांच्याच नजरा जान्हवीवर टिकल्या होत्या. तिच्या चाहत्यांच्या अपेक्षाही वाढल्या होत्या. पण आता या चर्चेला नवे वळण देणारी बातमी आहे. होय, जान्हवी भन्साळींच्या आॅफिसबाहेर दिसली, हे खरे असले तरी ती तिथे का गेली, यामागे मात्र एक वेगळीच स्टोरी आहे.  होय, जान्हवी आपल्या लहान बहीणीसोबत भन्साळींचे आॅफिस असलेल्या बिल्डिंगमध्ये गेली होती. पण भन्साळींना भेटण्यासाठी नव्हे तर भन्साळींची भाची शर्मिन सेहगल हिला भेटण्यासाठी. शर्मिन ही जान्हवीची बेस्ट फ्रेन्ड आहे. दोन वर्षांपूर्वी लॉस एंजिल्स येथे शर्मिन व जान्हवी एकत्र शिकत होत्या. तेव्हापासूनची त्यांची मैत्री आहे. शर्मिनची आई बेला सेहगल ही भन्साळींची बहीण आहे. शर्मिन आपल्या आई व बहीणीसोबत ज्या बिल्डींगमध्ये राहते, त्याच बिल्डिंगमध्ये भन्साळींचे आॅफिस आहे. या बिल्डिंगमध्ये जान्हवी केवळ आपल्या बेस्ट फे्रन्डला भेटण्यासाठी गेली होती. पण पापाराझींनी तिला बिल्डिंगमधून बाहेर येताना पाहिले आणि ती भन्साळींना भेटण्यासाठी गेली होती, असा कयास लावून भलतीच चर्चा सुरू झाली.

ALSO READ : संजय लीला भन्साळींना भेटण्यासाठी जान्हवी कपूर पोहोचली ऑफिसमध्ये !

 गत २४ फेब्रुवारीला दुबईच्या एका हॉटेलात श्रीदेवींनी अंतिम श्वास घेतला होता. २८ फेबु्रवारीला श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर दहाचं दिवसांत जान्हवी कामावर परतली होती. सध्या ती ‘धडक’ या आपल्या डेब्यू सिनेमात बिझी आहे.  ‘धडक’हा मराठी ‘सैराट’चा रिमेक आहे. ‘सैराट’ मराठीमधील ब्लॉकबस्टर चित्रपट असून, या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. दरम्यान, ‘सैराट’च्या हिंदी ‘धडक’ची कथा काहीशी वेगळी असून, यामध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: Sanjay Leela did not meet Bhansali, but for 'this' reason, he went to the building Jhanvi Kapoor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.