पुतणीच्या लग्नाचा काका संजय कपूरला झाला इतका आनंद की रस्त्यावरच केला भांगडा, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 17:26 IST2018-05-05T11:56:49+5:302018-05-05T17:26:57+5:30

पुतणी सोनम कपूरच्या लग्नाची सध्या कपूर परिवाराकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशात कपूर परिवारात आनंदाचे वातावरण आहे.

Sanjay Kapoor, the uncle of the bride, is so happy that she is on the road, see video! | पुतणीच्या लग्नाचा काका संजय कपूरला झाला इतका आनंद की रस्त्यावरच केला भांगडा, पाहा व्हिडीओ!

पुतणीच्या लग्नाचा काका संजय कपूरला झाला इतका आनंद की रस्त्यावरच केला भांगडा, पाहा व्हिडीओ!

्या अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजा यांच्या लग्नाची बी-टाउनमध्ये जोरदार चर्चा आहे. २०१८मधील सर्वात मोठे लग्न म्हणून याकडे बघितले जात आहे. कपूर आणि आहुजा परिवाराकडून लग्नाची जय्यत तयारी केली जात असून, परिवारातील प्रत्येक सदस्य कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त आहे. सध्या सोनमच्या लग्नासाठी पाहुणे मंडळी येण्यास सुरुवात झाली असून, त्या प्रत्येकावर मीडियाची नजर असल्याचे दिसून येत आहे. अशात सोनमचे काका संजय कपूर प्री-वेडिंग बॅशसाठी लग्नघरी पोहोचले. जेव्हा तो पत्नी महीपसोबत कारमधून खाली उतरला तेव्हा त्याच्या उत्साहाला पारावार उरला नव्हता. मीडियाच्या समोरच त्याने भांगडा करायला सुरुवात केली. 

काका संजय कपूरच्या चेहºयावरील आनंद यावेळी बघण्यासारखा होता. कारण तो त्याच्याच धुंदीत मीडियासमोर भर रस्त्यात भांगडा करीत होता. संजय कपूरचा हा अंदाज त्याचा मोठा भाऊ अनिल कपूरशी चांगलाच मिळता जुळता आहे. दरम्यान, संजयप्रमाणे अभिनेता वरुण धवन लग्नघरी अगोदरपासूनच पोहोचला आहे. या व्यतिरिक्त जॅकलीन फर्नाडिस, अनुपम खेर, सतीश कौशिक, मसाबा मन्तेना, अंशुला कपूर असे बरेचसे स्टार्स प्री-वेडिंग बॅशमध्ये सहभागी झाले आहेत. सोनमचे वडील अनिल कपूर मुलीच्या लग्नामुळे खूप आनंदी असून, सध्या ते त्याच्या तयारीत व्यस्त असल्याचे दिसत आहे. 
 

दरम्यान, कपूर आणि आहुजा परिवाराने संयुक्तरीत्या घोषणा करताना सांगितले होते की, सोनम आणि आनंदचा विवाह येत्या ८ मे रोजी मुंबई येथे पार पडणार आहे. दरम्यान, गेल्या बºयाच काळापासून सोनम आणि आनंद एकमेकांना डेट करीत आहेत; मात्र त्यांनी कधीही त्यांच्यातील रिलेशनशिपचा जाहीरपणे खुलासा केला नव्हता. अशात हे दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याने इंडस्ट्रीत सध्या आनंदाचे वातावरण आहे. 

Web Title: Sanjay Kapoor, the uncle of the bride, is so happy that she is on the road, see video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.