संजय कपूरला मिळाला Most Inspiring Bollywood Actor पुरस्कार, नेटिझन्सनी उडवली अशी खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 11:37 AM2019-10-01T11:37:24+5:302019-10-01T11:40:31+5:30

संजयला राजा वगळता एकही हिट चित्रपट देता आला नाही. पण तरीही त्याला मोस्ट इन्सपायरिंग इंडियन बॉलिवूड ॲक्टर हा पुरस्कार मिळाल्यामुळे सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे.

Sanjay Kapoor receives the award for Most Inspiring Indian Bollywood Actor in UK, got trolled on social media | संजय कपूरला मिळाला Most Inspiring Bollywood Actor पुरस्कार, नेटिझन्सनी उडवली अशी खिल्ली

संजय कपूरला मिळाला Most Inspiring Bollywood Actor पुरस्कार, नेटिझन्सनी उडवली अशी खिल्ली

googlenewsNext
ठळक मुद्देसंजयला मोस्ट इन्सपायरिंग इंडियन बॉलिवूड ॲक्टर हा पुरस्कार मिळाल्यामुळे सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे. हा किती मस्त जोक आहे असे काही नेटिझन्सनी या फोटोवर कमेंट करताना म्हटले आहे

संजय कपूरने आपल्या करिअरची सुरुवात १९९५ साली आलेल्या प्रेम या चित्रपटातून केली. या चित्रपटात त्याची अभिनेत्री होती तब्बू. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. यानंतर तो दिसला बॉलिवूड दिवा माधुरी दीक्षितसोबत राजामध्ये. हा चित्रपट संजय कपूरच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटानंतर रातो-रात तो स्टार बनला. यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र या चित्रपटानंतर संजयला म्हणावे तसे यश मिळाले नाही. पण तरीही संजयला नुकताच युकेमधील हाऊस ऑफ कॉमनने मोस्ट इन्सपायरिंग इंडियन बॉलिवूड ॲक्टर हा पुरस्कार दिला आहे. पण हा पुरस्कार मिळाल्यानंतर संजयला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.

संजयला राजा वगळता बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट देता आला नाही. पण तरीही त्याला मोस्ट इन्सपायरिंग इंडियन बॉलिवूड ॲक्टर हा पुरस्कार मिळाल्यामुळे सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे. हा किती मस्त जोक आहे असे काही नेटिझन्सनी या फोटोवर कमेंट करताना म्हटले आहे तर संजयमुळे कोणाला प्रेरणा मिळाली असा देखील सवाल नेटिझन्सने विचारला आहे. तसेच पुरस्कार स्वीकारताना मी काहीही केलेले नसताना हा पुस्कार मला का दिला जात आहे हा विचार देखील संजयने केला नाही का असे देखील लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत आहेत. ज्यूरीमधील लोक पागल होते का, संजयचे चित्रपट देखील आम्हाला आठवत नाहीयेत असे लोक सोशल मीडियाद्वारे कमेंट करताना दिसत आहेत.

संजयने अभिनय करण्यासोबतच तीन चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी दिल संभल जा जरा या मालिकेत देखील काम केले होते. पण या मालिकेला देखील प्रेक्षकांचे म्हणावे तसे प्रेम मिळाले नाही. संजय कपूरला शनाया आणि जहान अशी दोन मुले असून शनाया सध्या द कारगिल गर्ल या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत आहे. तसेच ती लवकरच अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार आहे. 

Web Title: Sanjay Kapoor receives the award for Most Inspiring Indian Bollywood Actor in UK, got trolled on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.