संजय दत्तचा 'द भूतनी' OTTवर लवकरच येणार भेटीला, कधी आणि कुठे पाहू शकतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:23 IST2025-07-11T17:22:40+5:302025-07-11T17:23:11+5:30
अभिनेता संजय दत्त(Sanjay Dutt)चा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'द भूतनी' (The Bhootani)ने थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर दाखल होत आहे.

संजय दत्तचा 'द भूतनी' OTTवर लवकरच येणार भेटीला, कधी आणि कुठे पाहू शकतो?
अभिनेता संजय दत्त(Sanjay Dutt)चा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'द भूतनी' (The Bhootani) १ मे रोजी अजय देवगणच्या 'रेड २' सोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात मौनी रॉय, पलक तिवारी आणि सनी सिंग सारखे कलाकार देखील आहेत. मात्र, मोठी स्टारकास्ट आणि प्रमोशन असूनही, चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर दाखल होत आहे.
चित्रपटाची दिल्लीच्या सेंट व्हिन्सेंट्स कॉलेजमध्येच्या अवतीभवती फिरते. जिथे व्हॅलेंटाईन डे आला की, एक भूत आणि झाड मिळून राडा घालतात आणि या सगळ्यात अडकतो शांतनू (सनी सिंग) ज्याच्या ब्रेकअपने आधीच वाट लागलीय, आणि आता त्याने चुकून जागवलंय मोहब्बत नावाची एक भावुक पण धोकादायक आत्मा! जसं-जसं मोहब्बत शक्तिशाली होते, कॅम्पसवर येतात विचित्र भास, फोटो आणि मृत्यूंची सीरिज आणि मग एंट्री होते बाबांची (संजय दत्त). हातात झोळी, डोक्यात तंत्र, आणि एक रहस्यमय भूतकाळ. मोहब्बतला काय हवंय? आणि बाबा खरंच मदत करायला आलाय, की तोच आहे खरा गेम प्लानर? द भूतनी १८ जुलैपासून रात्री ८ वाजता झी ५ आणि झी सिनेमावर पाहायला मिळेल.
संजय दत्त म्हणाले, "'द भूतनी' ही खरंच एक हटके, धमाल आणि वेगळी फिल्म आहे. थिएटरमध्ये ती थोडी कमी स्क्रीन्समध्ये हरवली, पण आम्ही मनापासून बनवली आहे. झी ५ आणि झी सिनेमावर ती नक्की आपल्याला हसवेल आणि थोडंसं घाबरवेलही!" मौनी रॉय म्हणाल्या, "मोहब्बत हे पात्र खूपच वेगळं होतं भावनांनी भरलेलं, सस्पेन्स आणि थोडंसं भयानकही! संजय सरसोबत काम करणं म्हणजे एक मोठा अनुभव होता. सिद्धांतने माझ्यावर विश्वास टाकला यासाठी मी कायम ऋणी राहीन." सनी सिंग म्हणाले, "शांतनू म्हणजे एक सामान्य मुलगा – पण अडकतो थेट भूतांच्या गोंधळात! या सिनेमात हॉरर आणि विनोदाचा जबरदस्त तडका आहे. संजय सर, मौनी आणि पलक यांच्यासोबत काम करणं म्हणजे एक धमाल प्रवास होता!" पलक तिवारी म्हणाल्या, "अनन्या ही पात्र हुशार, धाडसी आणि खूप वेगळ्या परिस्थितीत सापडलेली. सेटवर खूप मजा आली. संजय सरकडून खूप शिकायला मिळालं आणि सिद्धांत सरचं दिग्दर्शन म्हणजे टोटल गाइडन्स!"