संजय दत्तच्या ‘भूमी’ची रिलीज डेट बदलली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 16:55 IST2017-04-22T11:25:59+5:302017-04-22T16:55:59+5:30

अभिनेता संजय दत्तचा कमबॅक चित्रपट ‘भूमी’ची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. आमीर खानच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ला क्लॅश होऊ नये म्हणून ...

Sanjay Dutt's 'Land' release date changed! | संजय दत्तच्या ‘भूमी’ची रिलीज डेट बदलली!

संजय दत्तच्या ‘भूमी’ची रिलीज डेट बदलली!

िनेता संजय दत्तचा कमबॅक चित्रपट ‘भूमी’ची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. आमीर खानच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ला क्लॅश होऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच संजूबाबा ‘भूमी’ची रिलीज डेट बदलण्याचा विचार करीत होता. आमीरचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ दिवाळीला रिलीज होणार आहे. आता भूमी या दिवाळीत रिलीज होणार नसल्याने बॉक्स आॅफिसवर होणारा क्लॅश टाळला जाणार आहे. 

संजूबाबाचा ‘भूमी’ आता २२ सप्टेंबर रोजी रिलीज केला जाणार आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ‘भूमी’चे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरवर रिलीज डेट ४ आॅगस्ट २०१७ दिली होती. पुढे आमीरच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’चीही रिलीज डेट ४ आॅगस्ट २०१७ घोषित करण्यात आली. तेव्हाच संजूबाबाने ‘भूमी’ची रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतला होता. 

मिड डेच्या सुत्रानुसार, संजूबाबा आमीरशी पंगा घेऊ इच्छित नाही. दोघांमधील चांगले संबंध तो पुढेही कायम ठेऊ इच्छितो. कारण अशी बरेचशी उदाहरणे आहेत की, चांगले मित्र बॉक्स आॅफिसवरील घमासानमुळे एकमेकांचे वैरी झाले आहेत. (वर्षाच्या सुरुवातीला ‘काबिल’ आणि ‘रईस’ या चित्रपटांचा क्लॅश झाला होता) आमीरचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट लो बजेट आहे; मात्र आमीरचा चित्रपट असल्याने तो बॉक्स आॅफिसवर घमासान करेल अशीच चर्चा सध्या रंगत आहे. त्यामुळेच कदाचित संजूबाबानेही आपला चित्रपट पुढे ढकलण्याबाबत विचार केला असावा. 



सुत्रानुसार संजूबाबानेच ‘भूमी’च्या निर्मात्यांशी चर्चा करून चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यास सांगितले होते. मिड डेशी बोलताना संजय दत्तने सांगितले होते की, मला माहीत आहे एक चित्रपट बनवायला किती मेहनत घ्यावी लागते. एवढी मेहनत घेतल्यानंतरही जर चित्रपट बॉक्स आॅफिसवर करिष्मा दाखवू शकणार नसेल तर, सर्वांची मेहनत निष्फळ ठरते. शिवाय एकमेकांची दुश्मनीही यानिमित्त पत्करावी लागते. मी आणि आमिर खूप चांगले मित्र आहोत, त्यामुळे मला हा वाद विकोपाला जाऊ द्यायचा नसल्याचे त्याने सांगितले होते. 

आता आमीरचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ अजय देवगणच्या ‘गोलमाल-४’शी क्लॅश होणार आहे. दोन्ही चित्रपट येत्या दिवाळीला रिलीज होणार आहेत. या फाइटमध्ये ‘रोबोट-२’चीही टक्कर होण्याची शक्यता होती, परंतु निर्मात्यांनी ‘रोबोट-२’चीही रिलीज डेट पुढे ढकलली आहे. 

Web Title: Sanjay Dutt's 'Land' release date changed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.