रिलीज आधी संजय दत्तच्या बायोपिकने मारला सिक्सर, कमावले 180 कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2017 17:50 IST2017-06-07T06:53:04+5:302017-06-12T17:50:20+5:30

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या खूपच चर्चेत आहे. नुकतीच त्यांने आगामी चित्रपट भूमीची शूटिंग पूर्ण केले आहे. सगळ्यात जास्त ...

Sanjay Dutt's biopic killed Siksar before release, 180 million earned! | रिलीज आधी संजय दत्तच्या बायोपिकने मारला सिक्सर, कमावले 180 कोटी!

रिलीज आधी संजय दत्तच्या बायोपिकने मारला सिक्सर, कमावले 180 कोटी!

लिवूड अभिनेता संजय दत्त सध्या खूपच चर्चेत आहे. नुकतीच त्यांने आगामी चित्रपट भूमीची शूटिंग पूर्ण केले आहे. सगळ्यात जास्त तो त्याच्या बायोपिकला घेऊन चर्चेत आहे. या चित्रपटात संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारतो आहे. रणबीर कपूरसह सोनम कपूर, अनुष्का शर्मा, परेश रावल, करिश्मा तन्ना, विकी कौशल , दिया मिर्झा यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. 

संजय दत्तची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी रणबीर प्रचंड मेहनत घेतोय. यासाठी त्यांने वजन वाढवले होते तसेच दाढीसुद्धा वाढवली होती. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले होते ज्यात तो हुबेहुब संजय दत्तसारखा दिसत होता. या चित्रपटात रणबीर कपूर एक नाही, दोन नाही तर एकूण सहा वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. रॉकी’ ते ‘खलनायक’ आणि ‘खलनायक’ ते ‘मुन्नाभाई’ अशा सगळ्या चित्रपटात संजय दत्त वेगवेगळ्या रूपात दिसला. 

या चित्रपटाचे सेटेलाईट अधिकार विकत घेण्यात आले आहेत. चित्रपटाचे राइट्स विकून राजकुमार हिरानी यांना मिळालेली रक्कम ही त्यांच्या पीके चित्रपटापेक्षा ही जास्त आहे. संजय दत्तचे बायोपिकचे राइट्स फॉक्स स्टार स्टुडिओने 180 कोटीला विकत घेतले आहे. 2014 मध्ये आलेल्या राजकुमार हिरानी यांच्या पीके चित्रपटाचे राइट्स फॉक्स स्टुडिओने 110 कोटीला घेतले होते.
 
संजय दत्तच्या बायोपिकच्या माध्यमातून पहिल्यांदा राजकुमार हिरानी मोठ्या पडद्यावर काम करताना दिसणार आहे. मनीषा कोईराला या चित्रपट रणबीर कपूरच्या आईची म्हणजेच नर्गिस यांची भूमिका साकारणार आहे  30 मार्च 2018 ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

Web Title: Sanjay Dutt's biopic killed Siksar before release, 180 million earned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.