बाबा झाला ज्येष्ठ नागरिक;  म्हणे,आता मलाही पेन्शन मिळणार ना?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 15:17 IST2019-07-30T15:17:04+5:302019-07-30T15:17:40+5:30

बाबा की उम्र पर मत जाओ, अभी तो वह जवान है, असे जॅकी श्रॉफ गमती-गमतीत म्हणाले आणि बाबाही मूडमध्ये आला.

sanjay dutt turns 60 wants pension now | बाबा झाला ज्येष्ठ नागरिक;  म्हणे,आता मलाही पेन्शन मिळणार ना?  

बाबा झाला ज्येष्ठ नागरिक;  म्हणे,आता मलाही पेन्शन मिळणार ना?  

ठळक मुद्दे‘प्रस्थानम’ या चित्रपटात संजय दत्त एका राजकीय नेत्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट तेलगू सिनेमा ‘प्रस्थानम’चा हिंदी रिमेक आहे. 

अभिनेता संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला हिंदी सिनेमा ‘प्रस्थानम’ हा चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाच्या टीजर लॉन्च इव्हेंटमध्ये संजय दत्त, जॅकी श्रॉफ, मनीषा कोईराला असे सगळे मस्ती मूडमध्ये दिसले. बाबा की उम्र पर मत जाओ, अभी तो वह जवान है, असे जॅकी श्रॉफ गमती-गमतीत म्हणाले आणि बाबाही मूडमध्ये आला. ‘मोदी सरकार 60 वर्षांनंतरच्या ज्येष्ठ नागरिकांना भत्ता आणि पेन्शन देण्याचे म्हणतेय. त्यामुळे मलाही भत्ता आणि पेन्शन का? असा प्रश्न मी नेहमीच माझ्या पत्नीला विचारतो. कारण मी सुद्धा 60 वर्षांचा आहे,’असे संजूबाबा हसतहसत म्हणाला.

60 हे वय सामान्यपणे निवृत्तीचे वय मानले जाते, अशात संजयही चित्रपटातून निवृत्त होणार का? असे विचारले असता, आता हे काय नवे? असा सवाल त्याने केला. साठी ओलांडली तर काम सोडणार, हे काय बोलणे झाले. श्वास आहे, तोपर्यंत काम करणार, असे तो म्हणाला.

पत्नी मान्यताबद्दलही तो बोलला. तुझी पत्नी मान्यता प्रॉडक्शन हाऊसची सर्वेसर्वा आहे. निर्माता म्हणून तिच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? असा प्रश्न संजयला विचारण्यात आला. यावर बाबा पुन्हा हसला. ‘मेरा दिल मेरे पास रहने दो. दिमाग का काम बीवी मान्यता का है. ती प्रोड्यूसर आहे. तिने जितकी फी दिली, तितकी मी मुकाट्याने घेतली. सेटवरही मी गुपचूप पोहोचायचो. कारण मॅडम रिअल लाईफ बॉस आहे आणि सेटवर प्रोड्यूसर साहिबा होती,’असे तो म्हणाला.
‘प्रस्थानम’ या चित्रपटात संजय दत्त एका राजकीय नेत्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट तेलगू सिनेमा ‘प्रस्थानम’चा हिंदी रिमेक आहे. 
 

Web Title: sanjay dutt turns 60 wants pension now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.