संजय दत्तसोबत ‘धकधक गर्ल’चा पुन्हा रोमान्स??
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 17:38 IST2016-08-06T12:08:45+5:302016-08-06T17:38:45+5:30
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित सिल्वर स्क्रीनवर पुन्हा एकदा संजय दत्तसोबत रोमान्स करताना दिसू शकते. विधू विनोद चोपडा यांच्या ‘मार्को ...
.jpg)
संजय दत्तसोबत ‘धकधक गर्ल’चा पुन्हा रोमान्स??
ब लिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित सिल्वर स्क्रीनवर पुन्हा एकदा संजय दत्तसोबत रोमान्स करताना दिसू शकते. विधू विनोद चोपडा यांच्या ‘मार्को भाऊ’ या चित्रपटाद्वारे संजय दत्त बॉलिवूडमध्ये कमबॅक करतो आहे. ९० च्या दशकात संजय आणि माधुरी ही जोडी प्रचंड गाजली होती. ‘खलनायक’,‘साजन’,‘महानता’,‘साहिबां’ अशा काही चित्रपटांत माधुरी व संजयची जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी ही विधू विनोद चोपडांच्या अतिशय जवळची आहे. विधू विनोद यांच्या ‘परिंदा’मध्ये ती दिसली होती. त्यामुळेच ‘मार्को भाऊ’ या चित्रपटासाठी ती होकार देऊ शकते. ‘मार्को भाऊ’ हा चित्रपट विधु विनोद यांची बहीण शैली चोपडा दिग्दर्शित करणार असल्याचे कळते. यात संजय दत्त एका मुलीच्या पित्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. संजयच्या मुलीच्या भूमिकेत क्रिती सेनॉन किंवा अथिया शेट्टी यांची वर्णी लागू शकते. आता माधुरी या चित्रपटात कुठल्या भूमिकेत दिसते ते बघूच!!