दोन फ्लॉपने वाढवली संजय दत्तची चिंता! घेतला मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 09:14 PM2018-08-31T21:14:49+5:302018-08-31T21:16:51+5:30

संजय दत्तचे पुनरागमन फसलेय. सध्या तरी हेच चित्र आहे. २०१७ मध्ये संजयने ‘भूमी’ चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. पण संजयच्या या कमबॅक चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. 

sanjay dutt not happy with his new career want to make his new team | दोन फ्लॉपने वाढवली संजय दत्तची चिंता! घेतला मोठा निर्णय!

दोन फ्लॉपने वाढवली संजय दत्तची चिंता! घेतला मोठा निर्णय!

googlenewsNext

संजय दत्तचे पुनरागमन फसलेय. सध्या तरी हेच चित्र आहे. २०१७ मध्ये संजयने ‘भूमी’ चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. पण संजयच्या या कमबॅक चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटाला १० कोटीपर्यंतही मजल मारता आली नाही. यानंतर गत महिन्यात त्याचा ‘साहब, बीवी और गँगस्टर3’ रिलीज झाला. या चित्रपटाकडून संजयला प्रचंड अपेक्षा होत्या. पण हा चित्रपटही सुपरडुपर ‘फ्लॉप’ झाला. या दोन चित्रपटाच्या अपयशानंतर संजूबाबा कमालीचा चिंतीत असल्याचे कळतेय. साहजिकचं करिअर वाचवण्यासाठी काही निर्णय घेणे त्याला भाग आहे. यातलाचं एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे, तूर्तास सोलो चित्रपट साईन न करण्याचे संजयने ठरवलेय. होय, सोलो चित्रपटाचे अख्खे अपयश लीड हिरोच्या खात्यात जमा होते. तूर्तास संजयला हे नकोय. हे टाळायचे तर मल्टिस्टारर चित्रपट करणे भाग आहे.
याशिवाय ओळखीच्या दिग्दर्शकाऐवजी नव-नव्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याकडे संजयचा कल आहे. केवळ इतकेच नाही तर आपल्या मॅनेजर आणि सल्लागारांची जुनी टीम बदलून त्यांच्याजागी नवी टीम आणण्याचा निर्णयही संजयने घेतला आहे.
२०१६ मध्ये तुरुंगातून सुटून आल्यावर संजयचे सगळे काम त्याची पत्नी मान्यता बघणार, अशी खबर होती. तसेच झालेही. पण मान्यतामुळे संजयच्या करिअरला फायदा कमी अन् नुकसानचं अधिक झाले. मान्यतामुळे संजयचे काही जुने मित्र दुरावल्याचेही कळते. इंडस्ट्रीच्या जाणकरांच्या मते, संजयच्या नव्या करिअरमधील मान्यताचा सहभाग राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’सोबतचं संपला. आता संजयला नवी टीम, नवे दिग्दर्शक आणि मल्टिस्टारर चित्रपट हवे आहेत. आता हे सगळे निर्णय संजयचे स्टारडम वाचवण्यात किती मदतगार ठरतात, ते बघूच.

Web Title: sanjay dutt not happy with his new career want to make his new team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.