दिवसेंदिवस खालवतेय संजय दत्तची प्रकृती, कॅन्सरवरील उपचारादरम्यानचा नवा फोटो आला समोर
By गीतांजली | Updated: October 5, 2020 12:26 IST2020-10-05T11:37:14+5:302020-10-05T12:26:34+5:30
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे.

दिवसेंदिवस खालवतेय संजय दत्तची प्रकृती, कॅन्सरवरील उपचारादरम्यानचा नवा फोटो आला समोर
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. या फोटोत संजय दत्त खूप कमजोर दिसतो आहे.संजूबाबा या फोटो आपल्या एक फॅनसोबत दिसतो आहे. संजय दत्तचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहते तो लवकर बरा व्हावासाठी प्रार्थना करतायेत.
यूजने केली लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, संजय दत्तचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका यूजरने लिहिले, बाबा खूप कमोजर दिसतो आहे. 'तो लवकरच ठीक व्हावा यासाठी मी प्रार्थना करतो आहे.' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले, 'आशा करतो की,तो लवकर बरा होईल.'
कुटुंबाकडून कोणतेच अधिकृत स्टेटमेंट नाही
संजय दत्तची प्रकृती ठीक नाही आहे. त्याने 11 ऑगस्टला सोशल मीडियावर सांगितले होते की, तो फुफ्फुसांच्या कर्करोगवरील उपचारांसाठी मोठ्या सुट्टीवर जाणार आहे. अलीकडेच संजय दत्त मुलांना भेटून दुबईवरुन मुंबईत उपचारांसाठी परत आहे. मुंबईत सध्या संजय दत्तची तिसरी किमोथेरेपी सुरु आहे.
संजय दत्तचे आगामी सिनेमा
संजय दत्तच्या वर्कफ्रंटबाबत बोलायाचे झाले तर त्याचे अनेक सिनेमा पाईपलाईनमध्ये आहेत. यात शमशेरा, केजीएफ- चॅप्टर 2, पृथ्वीराज, भुज- द प्राईड ऑफ इंडिया, तोरबाज यांचा समावेश आहे.
VIDEO : संजय दत्तने मास्कवरून घेतली फोटोग्राफर्सची शाळा, म्हणाला - मास्क लगा ना...
मुलांना भेटून दुबईहून कॅन्सरवरील ट्रीटमेंटसाठी मुंबईत परतला संजय दत्त