​संजय दत्तने दिले रणबीर कपूरला सरप्राइज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 15:32 IST2017-01-27T10:02:31+5:302017-01-27T15:32:31+5:30

संजय दत्त शिक्षा पूर्ण करून काहीच महिन्यांपूर्वी कारागृहातून बाहेर आला आहे. त्याने आता भूतकाळात झालेल्या गोष्टी विसरून त्याच्या अभिनय ...

Sanjay Dutt gives Ranbir Kapoor a surprise | ​संजय दत्तने दिले रणबीर कपूरला सरप्राइज

​संजय दत्तने दिले रणबीर कपूरला सरप्राइज

जय दत्त शिक्षा पूर्ण करून काहीच महिन्यांपूर्वी कारागृहातून बाहेर आला आहे. त्याने आता भूतकाळात झालेल्या गोष्टी विसरून त्याच्या अभिनय करियरकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे संजय लवकरच त्याच्या भूमी या कमबॅक चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण आग्रा येथे सुरू होणार आहे. तसेच त्याच्या आयुष्यावर आधारित असलेल्या चित्रपटाचेदेखील काहीच दिवसांपूर्वी चित्रीकरण सुरू झाले आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रेक्षकांना संजयच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या भूमी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याआधी त्याने त्याच्या आयुष्यावर बनवल्या जात असलेल्या चित्रपटाच्या सेटला नुकतीच भेट दिली. 
संजय दत्तच्या आयुष्यावर बनवण्यात येत असलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण मढ येथे सुरू आहे. या मढच्या सेटवर नुकतीच संजयने हजेरी लावली. त्याला पाहाताच सेटवरील सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. संजय सेटवर येणार असल्याची सेटवर कोणालाच कल्पना नव्हती. सगळ्यांनाच त्याने खूप छान सरप्राईज दिले. या चित्रपटाचे आतापर्यंत चित्रीत करण्यात आलेले शॉर्टस त्याने पाहिले आणि त्याला आवडले असल्याचेही टीमला सांगितले. एवढेच नव्हे तर त्याच्या उपस्थितीत चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले. त्यावेळी रणबीर प्रत्येक शॉर्टनंतर शॉर्ट आवडला की नाही हे अनेकवेळा संजयला विचारत असल्याचे पाहाण्यात आले. संजय सेटवर आल्यानंतर रणबीर सतत संजयसोबतच होता. संजयने चित्रपटाचे निर्माते विधु विनोद चोप्रा, रणबीर यांच्यासोबत लंचदेखील केला. राजकुमार हिरानी त्यांच्या कामात व्यग्र असल्याने त्यांना संजय दत्तसोबत जास्त वेळ घालवता आला नाही. संजयमुळे चित्रपटाच्या सेटवरील वातावरण संपूर्ण बदलून गेले होते. 


Web Title: Sanjay Dutt gives Ranbir Kapoor a surprise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.