कॅन्सरवरील उपचारांसाठी संजय दत्त मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 13:43 IST2020-08-19T13:42:51+5:302020-08-19T13:43:35+5:30
यावेळी संजय दत्त काहीसा शांत दिसला.

कॅन्सरवरील उपचारांसाठी संजय दत्त मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल
फुफ्फुसांच्या कॅन्सरवरील उपचारासाठी संजय दत्तला मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी संजय दत्त त्याच्या बिल्डिंगच्या खाली दिसला यावेळी त्याच्यासोबत पत्नी मान्यता दत्त, दोनही बहिणी (प्रिया दत्त आणि नम्रता दत्त) सोबत दिसल्या. यावेळी संजय दत्त काहीसा शांत दिसला. फोटोग्राफर्सना बघून त्याने विक्टरीचे साईन केले आणि त्याच्यासाठी प्रार्थना करायला सांगितल्या.
संजय दत्तला कॅन्सरवरील उपचारासांठी अमेरिकेला जायचे होते. मात्र मुंबई ब्लास्ट प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्याला परवानगी मिळाली नसल्याचे कळतेय. त्यामुळे तो सिंगापूरमध्ये जाऊन उपचार करु शकते. सध्या संजय दत्त कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो आहे.
संजय दत्तचा कॅन्सर चौथ्या स्टेजला आहे. त्याला मुलांची काळजी सतावते आहे. रिपोर्टनुसार, सुरुवातीला जेव्हा संजय दत्तचे रिपोर्टसमोर आले तेव्हा त्याला धक्का बसला होता काही दिवसांनी या आजाराला संजयने स्वीकारले आणि त्याच्याशी लढायला तयार झाला. संजयला आता त्याच्या 10 वर्षांच्या जुळ्या मुलांची काळजी सतावतेय. 'भुज', 'पृथ्वीराज', 'शमशेरा', 'केजीएफ २' सिनेमांमध्ये संजय दत्तच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.