Koffee with Karan season 5मध्ये सानिया मिर्झाने उघडी केली 'ही' गुपितं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 18:00 IST2017-02-06T12:25:52+5:302017-02-06T18:00:35+5:30

कॉफी विथ करणच्यामध्ये नुकतीच फराह खान आणि टेनिस प्लेअर सानिया मिर्झा यांनी हजेरी लावली होती. याशोमध्ये सानिया आणि फराहने ...

Sania Mirza opened with Koffee with Karan season 5, 'This' secret | Koffee with Karan season 5मध्ये सानिया मिर्झाने उघडी केली 'ही' गुपितं

Koffee with Karan season 5मध्ये सानिया मिर्झाने उघडी केली 'ही' गुपितं

फी विथ करणच्यामध्ये नुकतीच फराह खान आणि टेनिस प्लेअर सानिया मिर्झा यांनी हजेरी लावली होती. याशोमध्ये सानिया आणि फराहने खूप मजा मस्ती केली तसेच एकमेकांचे अनेक सिक्रेट ओपन केलीत. तसेच आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक किस्से शेअर केले. दोघींनी ही करणने विचारलेल्या प्रश्नांची मजेदार उत्तर दिली. याआधी सानिया आणि फराह खान कपिलच्या शो मध्ये सुद्धा एकत्र आल्या होत्या.  यावेळी करणने सानियाला तुला बॉलिवूडमध्ये  कधी कोणी अप्रोच केले नाही का? असा प्रश्न विचारला. यावर सानियाने असे कधी काही झाले नसल्याचे सांगितले.

यानंतर करणने सानियावर एका मागोमाग एक अनेक प्रश्नांचा भडिमार केला. करणने याशोदरम्यान तिला शाहिद कपूरवरुन सुद्धा छेडले. शाहिद आणि तू रिलेशनशीपमध्ये होतात की त्या सगळ्या नीव्वळ अफवा होत्या ? तुला कोणाला मारायचे आहे ? तुला कोणाबरोबर लग्न करायचे आहे? तुला कोणाबरोबर टेडवर जायला आवडले ? असे अनेक मजेदार प्रश्न करणने सानियाला विचारले आणि तिला उत्तर देण्यासाठी तीन अॅप्शन दिले. रणवीर सिंग, रणबीर कपूर आणि शाहिद कपूर. यावर हसत हसत सानियाने उत्तर दिले मला टेडवर रणवीर सिंग बरोबर जायला  आवडले तर रणबीर कूपरबरोबर लग्न आणि शाहिद कपूरला मारायला आवडेल.  सानिया आणि शाहिद एकमेकांना टेड करत होते अशा चर्चा दोघांच्या लग्नाच्या  आधी बी टाऊनमध्ये होत्या. मात्र सानियाने म्हणाली या सगळ्या जुनी गोष्टींबद्दल मला आता काही आठवत नाही. सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी विवाह केला आहे. 

Web Title: Sania Mirza opened with Koffee with Karan season 5, 'This' secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.