‘खान’ कुटुंबात संगीता बिजलानीची वापसी! वाचा, संपूर्ण बातमी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 10:27 IST2017-11-26T04:52:13+5:302017-11-26T10:27:43+5:30
संगीता बिजलानी व सलमान खानचे ब्रेकअप झाले, लग्न फिस्कटले. पण त्यांची मैत्री मात्र यानंतरही कायम होती. सलमानच्या घरच्या प्रत्येक ...
.jpg)
‘खान’ कुटुंबात संगीता बिजलानीची वापसी! वाचा, संपूर्ण बातमी!!
स गीता बिजलानी व सलमान खानचे ब्रेकअप झाले, लग्न फिस्कटले. पण त्यांची मैत्री मात्र यानंतरही कायम होती. सलमानच्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमात संगीता आवर्जून दिसायचीच दिसायची. पण अलीकडे सलमान व संगीताची मैत्री तुटल्याची चर्चा रंगली होती. ही चर्चा होण्यामागचे कारण होते, सलमानच्या घरच्या इव्हेंटमधून संगीताचे अचानक गायब होणे. होय, गेल्या कित्येक महिन्यांत संगीता सलमानच्या घरी फिरकली नव्हती. पण आता संगीता सलमानच्या घरी पुन्हा एकदा परतली आहे.
\
सलमान व संगीताच्या मैत्रीत अचानक मतभेद निर्माण होण्यामागे युलिया वंतूरचा (सलमानची कथित रोमानियन गर्लफ्रेन्ड) हात असल्याचे बोलले गेले होते. युलिया व संगीता एकाच जिममध्ये वर्कआऊट करतात. याठिकाणी एका क्षुल्लक कारणावरून युलियाने म्हणे जोरदार तमाशा केला होता. यानंतर संगीताने युलियापासूनच नव्हे तर सलमानच्या कुटुंबापासूनही अंतर राखणे सुरु केले होते. संगीता सलमानला २०१६ च्या नोव्हेंबरमध्ये अखेरची भेटली होती. यानंतर संगीता सलमानच्या कुटुंबाच्या कुठल्याही सदस्यासोबत दिसली नाही. पण आता संगीता पुन्हा परतली. सलमानचे अब्बू सलीम खान यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत संगीता सामील झाली. कदाचित सलमानने संगीताची समजूत काढलीयं आणि संगीतानेही सगळे मतभेद दूर सारून सलमानच्या कुटुंबाला जवळ केले.
![]()
![]()
ALSO READ : या अभिनेत्रीसोबत सलमान खानचे होणार होते लग्न, पत्रिकाही छापल्या होत्या
सलमान खान व संगीता बिजलानी म्हणजे एकेकाळचे प्रियकर-पे्रयसी. एकेकाळी दोघेही सीरिअस रिलेशनशिपमध्ये होते. खरे तर २७ मे १९९४ या तारखेला हे दोघे लग्न करणार असल्याचेही म्हटले जाते. पण ऐनवेळी हे लग्न फिस्कटले. हे लग्न फिस्कटण्यामागे सलमानच्या आयुष्यात सोमी अलीचा प्रवेश हे कारण मानले जाते. एका मुलाखतीत खुद्द संगीताने सलमानसोबतच्या ब्रेकअपमागचे कारण सांगितले होते. लग्नासाठी सलमानने स्वत: २७ मे ही तारीख निवडली होती. कारण त्याला घरून परवानगी मिळाली होती. पण लग्नाच्या महिनाभराआधी काहीतरी गडबड असल्याचे मला जाणवले. मी सलमानला फॉलो करणे सुरु केले आणि सलमान लग्नाच्याच काय तर बॉयफ्रेन्ड बनण्याच्याही लायकीचा नाही, असे मला जाणवले. तो एक इमोशनली, टॉमेटिक आणि टेरिबल अनुभव होता, असे संगीताने सांगितले होते. यानंतर संगीता बिजलानीने क्रिकेटपटू मोहम्मद अजहरूद्दीनसोबत लग्न केले होते.