'नो एंट्री'च्या सीक्वलमध्ये दिसणार सलमानचा डबल रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 17:17 IST2017-04-28T11:47:54+5:302017-04-28T17:17:54+5:30
दबंग खान अर्थात सलमान खान सध्या चांगलाच व्यस्त आहे. गेल्या वर्षीपासून त्याच्या नो एंट्री चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याची चर्चा ...

'नो एंट्री'च्या सीक्वलमध्ये दिसणार सलमानचा डबल रोल
द ंग खान अर्थात सलमान खान सध्या चांगलाच व्यस्त आहे. गेल्या वर्षीपासून त्याच्या नो एंट्री चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा सलमानला नो एंट्रीच्या सीक्वलबाबत विचारण्यात तेव्हा त्यांनी नाही असे उत्तर दिल होते. तर दुसरीकडे चित्रपटाचा दिग्दर्शक अनीस बज्मी यांने कंन्फर्म केले आहे की या चित्रपटाचा सीक्वल येतो आहे. अनीसने सांगितले आहे. सलमान खानला या चित्रपटाची कथा खूप आवडली आहे. याचित्रपटात सलमान आपल्याला डबल रोलमध्ये दिसणार आहे. एवढेच नाही तर सलमानसोबत अनिल कपूर, फरदीन खानही आपल्याला डब्बल रोलमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांनी मात्र चित्रपटाचे शूटिंग कधी सुरु होणार याबाबत अजून काही निश्चित नाही. या चित्रपटाच्या कथेला फायनल टच देण्याचे काम सुरु असल्याचेही तो म्हणाला आहे.
चित्रपट नो एंट्री 2005 मध्ये आला होता. यात सलमान खान, अनिल कपूर, फरदीन खान, लारा दत्ता, बिपाशा बासू, ईशा देओल आणि सेलिना जेटली यांची मुख्य भूमिका होती. तमिळमधल्या सुपरहिट चित्रपट चार्ली चैप्लिनचा रिमेक होता. जो 2005मध्ये सुपरहिट चित्रपट ठरला होता.
सलमान खान सध्या आगामी चित्रपट ट्यूबलाइटच्या चित्रिकरणात व्यस्त होता. लवकरच त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात चाइनीज अभिनेत्री झूझू पण आहे. याशिवाय सलमान टायगर जिंदा है याचित्रपटाचे तो शूटिंग करतोय. टायगर जिंदा है या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान-कॅटरिनाची जोडी 5 वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. तर अनिल कपूर अनीस बज्मीच्या मुबारकां या चित्रपटात दिसणार आहे.