सनी’ला सलमानचा अपशकून; ‘घायल’ला ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 10:40 IST2016-02-04T05:10:15+5:302016-02-04T10:40:15+5:30
सनी देओलचा मुख्य अभिनय असलेला ‘घायल वन्य अगेन’ चित्रपट पुन्हा प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे; मात्र या चित्रपटाचा पहिला टीजर ...

सनी’ला सलमानचा अपशकून; ‘घायल’ला ब्रेक
नी देओलचा मुख्य अभिनय असलेला ‘घायल वन्य अगेन’ चित्रपट पुन्हा प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे; मात्र या चित्रपटाचा पहिला टीजर हा सलमानच्या ‘दबंग2’ सोबत प्रदर्शित झाला होता. सलमानच्या चित्रपटासोबत ‘सनी’चा हा पुनरागमन टीजर जोडला गेला होता. त्यावेळी दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते; मात्र सनी देओलला चित्रपटाचे कथानक काहीसे आवडले नाही. त्यामुळे सनीने चित्रपट बंद करणे पसंत केले आणि संतोषी यांनी देखील दिग्दर्शन थांबविले. त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे सनी देओलने चित्रपटाच्या आर्थिक गणिताची विस्कटणारी घडी बसविण्यासाठी स्वत:चे स्टुडिओही गहाण ठेवल्याची चर्चा ऐकू येऊ लागली आहे; मात्र चित्रपटाच्या व्यवस्थापन मंडळाने ही चर्चा निष्फळ असल्याचे सांगितले आहे. चित्रपट असाच तयार केला जात आहे, जसे अन्य चित्रपट तयार होतात, असे कारण पुढे केले आहे.
.jpg)
.jpg)