एक्स गर्लफ्रेण्ड रडायची तेव्हा सलमानला हसू आवरणे व्हायचे अशक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 17:26 IST2017-06-15T11:56:39+5:302017-06-15T17:26:39+5:30

सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यातील नाते दिवसागणिक दृढ होताना दिसत आहे. परंतु एक काळ असाही होता, जेव्हा कॅटरिना ...

Salman is unlikely to be laughing when the X girlfriends cry! | एक्स गर्लफ्रेण्ड रडायची तेव्हा सलमानला हसू आवरणे व्हायचे अशक्य!

एक्स गर्लफ्रेण्ड रडायची तेव्हा सलमानला हसू आवरणे व्हायचे अशक्य!

मान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यातील नाते दिवसागणिक दृढ होताना दिसत आहे. परंतु एक काळ असाही होता, जेव्हा कॅटरिना रडायची तेव्हा सलमानला खूप हसायला येत होते. हे आम्ही नाही तर खुद्द कॅटनेच सांगितले आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की, इंडस्ट्रीत कॅटचा कोणीही गॉडफादर नाही. तिने स्वत:च्या हिमतीवर इंडस्ट्रीत यश आणि नाव कमावले आहे. मात्र ही गोेष्ट तेव्हाची आहे, जेव्हा कॅटरिना इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी धडपड करीत होती. त्यावेळी ती प्रचंड त्रस्त असायची. तिची ही दशा बघून सलमानला मात्र खूप हसायला येत होते. 

आपल्या स्ट्रगलिंग काळाचे स्मरण करताना कॅटरिनाने फिल्मफेयर दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा उलगडा केला. तिने म्हटले की, जेव्हा मला चित्रपटातून काढून टाकले जात असे तेव्हा मी माझे गाºहाणे घेऊन सलमानकडे येत होती. त्याच्याजवळ मी रडायची मात्र तो माझ्या या स्थितीवर रडायचा. अशातही मला त्याच्यावर खूप विश्वास होता. एक आठवण सांगताना कॅटने म्हटले की, मला अनुराग बासू यांच्या जॉन अब्राहम स्टारर ‘साया’ या चित्रपटात संधी मिळाली होती. चित्रपटात मला भुताची भूमिका साकारायची होती. मात्र दोनच दिवसांत माझी चित्रपटातून हकालपट्टी करण्यात आली. मी माझ्या रूमबाहेर रडत आली. डोळ्यातील अश्रूंच्या धारा थांबायचे नाव घेत नव्हते. 



पुढे मी सलमानला भेटले. त्याला पाहताच मला पुन्हा रडायला आले. मी रडत रडतच त्याला म्हटले की, आता माझे करिअर संपले आहे. मी खूपच रडत होते. माझ्या डोळ्यातील अश्रू काहीही केल्यास थांबायचे नाव घेत नव्हते. माझे दु:ख बघून कोणालाही रडायला येईल, अशीच काहीशी स्थिती होती. परंतु सलमान मला बघून दु:खी न होता, जोरजोरात हसायला लागला. त्याने माझा हात पकडून बसायला सांगितले. एक चित्रपट हातातून गेला म्हणजे एवढे उदास होण्याची गरज नाही, असे म्हणून तो माझी समजूत काढत होता. शिवाय ही सुरुवात आहे, यानंतर बरेचशा संधी येणार आहेत. मला माहीत आहे की, तू पुढच्या पाच वर्षांनंतर कुठे असशील. फक्त तू तुझ्या कामावर फोकस कर, असा दिलासा सलमान देत होता. त्याचे हे शब्द बळ देणारे होते, असेही कॅटने म्हटले. 

सलमान आणि कॅटरिना एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात होते. पुढे त्यांचे ब्रेकअप झाले. आता हे दोघे पुन्हा एकदा ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटात एकत्र काम करीत असल्याने त्यांच्यात जवळीकता वाढली आहे. हे दोघे लवकरच मोरोको येथे चित्रपटाच्या शूटिंगसाठी रवाना होणार आहेत. दोघांमध्ये ब्रेकअप झाले असले तरी, आजही कॅट सलमानच्या खूपच क्लोज आहे. त्याने तिला कधीच स्वत:पासून दूर केलेले नाही. 

Web Title: Salman is unlikely to be laughing when the X girlfriends cry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.