सलमान खानच्या ट्यूबलाइटने रिलीज आधी तोडले सगळे रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 12:59 IST2017-05-11T07:29:40+5:302017-05-11T12:59:40+5:30

बॉलिवूडच्या भाईजानेचे देशासह परदेशात ही अनेक चाहते आहेत. असा जगाच्या नकाशावरची जागा नाही जिथे लोकांमध्ये दबंग खान अर्थात सलमान ...

Salman Khan's TubLight records all the breaks released before release | सलमान खानच्या ट्यूबलाइटने रिलीज आधी तोडले सगळे रेकॉर्ड

सलमान खानच्या ट्यूबलाइटने रिलीज आधी तोडले सगळे रेकॉर्ड

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">बॉलिवूडच्या भाईजानेचे देशासह परदेशात ही अनेक चाहते आहेत. असा जगाच्या नकाशावरची जागा नाही जिथे लोकांमध्ये दबंग खान अर्थात सलमान खानाबद्दल क्रेझ नाही. याच कारणामुळे कदाचित सल्लू मियाँचा आगामी चित्रपट ट्यूबलाइटने रिलीज पूर्वीच रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली.   
सध्या बाहुबली 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड तयार करत असतानाच ट्यूबलाइटने रिलीज पूर्वीच रेकॉर्ड तयार करत सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे.  
गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या ट्यूबलाईटच्या टीजरला यूट्यूबवर 48 तासात 1 कोटी लोकांनी पाहिले एवढ्या मोठ्या प्रमाणाता पाहण्यात आलेला हा पहिलाच व्हिडिओ आहे. एवढेच नाही तर 15 तासाच्या आता 1 लाख लोकांना हा व्हिडिओ लाईक केला होता. आतापर्यंत जवळपास दीड लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. याआधी कोणत्याच अभिनेत्याबाबत प्रेक्षकांनामध्ये एवढी क्रेझीनेस दिसली नव्हती. ट्यूबलाइट हा चित्रपट १९६२ साली झालेल्या चीन युद्धावर आधारित आहे.  विशेष म्हणजे, शाहरूख खान यात एका कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कबीर खानचा सलमानसोबतचा हा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘एक था टायगर’ या कबीरच्या दोन सिनेमात सलमान दिसला होता.  
सलमान खान गेल्या वर्षी सुलतान या चित्रपटातनंतर जवळपास एक वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.  ट्यूबलाइटचा टीजर जर प्रेक्षकांना एवढा असेल तर चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना पसंतीस उतरले यात काही शंका नाही. 

Web Title: Salman Khan's TubLight records all the breaks released before release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.