प्रदर्शनाआधीच पैसे वसूल, इतक्या कोटीत विकले सलमानच्या ‘राधे’चे हक्क!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 12:26 IST2020-12-30T12:24:31+5:302020-12-30T12:26:17+5:30
कोरोना काळात साईन केली सर्वात मोठी डिल

प्रदर्शनाआधीच पैसे वसूल, इतक्या कोटीत विकले सलमानच्या ‘राधे’चे हक्क!!
कोरोना महामारीमुळे बॉलिवूडचे अनेक सिनेमे रिलीज होता होता राहिले. काही ओटीटीवर रिलीज झालेत तर काही अद्यापही रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत. भाईजान सलमान खानचा ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा असाच एक बहुप्रतिक्षीत सिनेमा. खरे तर या मावळत्या वर्षात ईदच्या मुहूर्ताला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे सगळे वेळापत्रकच विस्कटले. आता हा सिनेमा कधी रिलीज होईल, हे माहित नाही. पण हो, या सिनेमाने रिलीजआधीच भरभक्कम कमाई केलीये.
बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, सलमानच्या ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’चे सॅटेलाईट, थिएटर रिलीज, डिजिटल रिलीज व म्युझिक राईट्स झी स्टुडिओला विकण्यात आले आहेत. ही डिल कितीची तर तब्बल 230 कोटींची. म्हणजेच काय तर रिलीज होण्याआधीच या सिनेमाने 230 कोटी कमावले आहेत. या डिलची बातमी खरी मानाल तर कोरोना काळातील बॉलिवूडची ही सर्वात मोठी डिल आहे.
‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात सलमान व दिशा पाटनी मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. प्रभुदेवाने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
यापूर्वी सलमानच्या ‘रेस 3’, ‘भारत’ व ‘दबंग 3’चे सॅटेलाईट हक्कही झी सिनेमानेच खरेदी केले होते. सलमानच्या प्रॉडक्शनचा ‘कागज’ हा सिनेमाही झी 5 वर रिलीज होणार आहे.
सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या तो ‘अंतिम- द फायनल ट्रूथ’ या सिनेमात बिझी आहे. यात सलमानचा मेव्हणा आयुष शर्मा लीड रोलमध्ये आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमात आयुष आणि सलमान दोघेही एकदम हटके लूकमध्ये दिसणार आहेत.
कोरोनाच्या भीतीने 'राधे'चं शूटींग कसं करतोय बघा सलमान खान, दिशासोबत गाणं होतंय शूट....