सलमान खानचा नवा बाल्ड लूक चर्चेत, व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणताहेत - 'तेरे नाम २'ची होतेय तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 01:03 PM2023-08-21T13:03:22+5:302023-08-21T13:03:22+5:30

Salman Khan : सलमान खान नुकताच बाल्ड लूकमध्ये स्पॉट झाला होता. त्याचा या दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Salman Khan's new bald look is in discussion, the video is viral, fans say - 'Tere Naam 2' is getting ready | सलमान खानचा नवा बाल्ड लूक चर्चेत, व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणताहेत - 'तेरे नाम २'ची होतेय तयारी

सलमान खानचा नवा बाल्ड लूक चर्चेत, व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणताहेत - 'तेरे नाम २'ची होतेय तयारी

googlenewsNext

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या या अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरेतर, रविवार, २० ऑगस्ट रोजी मुंबईतील एका पार्टीत बॉलिवूडचा भाईजान त्याच्या नव्या बाल्ड लुकमध्ये दिसला. सलमान खान 'तेरे नाम २' ची तयारी करत असल्याच्या चर्चांना उधाण आले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सलमान खान त्याच्या कारमधून उतरताना दिसत आहे. भाईजान एका पार्टीत सहभागी होण्यासाठी मुंबईत आला होता. यादरम्यान, अभिनेता बाल्ड लूकमध्ये दिसला. या पार्टीसाठी सलमानने काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. व्हिडीओमध्ये चाहते ‘भाई, भाई’ असे ओरडताना दिसत आहेत. त्याचवेळी पापाराझीनेही सलमानच्या या नव्या लुकचे फोटो काढले आणि व्हिडिओ बनवला.

सलमान खानच्या नव्या लूकवर चाहते देताहेत प्रतिक्रिया
सलमान खानचा नवीन लूक पाहून चाहते 'तेरे नाम 2 ची अभिनेता तयारी करत असल्याच्या कयासांना चालना मिळाली आहे. व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले, "तेरे नाम २ स्क्रिप्ट तयार आहे." दुसऱ्याने लिहिले, "कदाचित तेरे नाम २ येत आहे." दुसऱ्याने लिहिले, "तेरे नाम २ लवकरच येत आहे."

सलमान खानचा 'टायगर ३' लवकरच येणार भेटीला
सध्या सलमान खान २०२३ च्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक असलेल्या 'टायगर ३' च्या रिलीजची तयारी करत आहे. या चित्रपटात सलमान खान पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले आणि आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर टायगर आणि झोयाच्या जोडीची जादू पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याच वेळी, निर्माते हा चित्रपट मोठा आणि चांगला बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत.


'टायगर' मालिकेव्यतिरिक्त सलमान खान 'प्रेम की शादी' या चित्रपटासाठी सूरज बडजात्यासोबत पुन्हा एकत्र येणार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, सलमानने अद्याप या अफवांना दुजोरा दिलेला नाही.

Web Title: Salman Khan's new bald look is in discussion, the video is viral, fans say - 'Tere Naam 2' is getting ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.