​‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त होती सलमान खानची हिरोईन स्नेहा उल्लाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 15:34 IST2017-06-02T10:04:34+5:302017-06-02T15:34:34+5:30

‘लकी’ या चित्रपटातील सलमान खानची हिरोईन आठवते. होय, तीच ती ऐश्वर्या रायसारखी दिसणारी,स्नेहा उल्लाल. गेल्या चार वर्षांपासून स्रेहा बॉलिवूडमध्ये ...

Salman Khan's Heroine Sneha Ullal was suffering from 'this' serious illness! | ​‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त होती सलमान खानची हिरोईन स्नेहा उल्लाल!

​‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त होती सलमान खानची हिरोईन स्नेहा उल्लाल!

की’ या चित्रपटातील सलमान खानची हिरोईन आठवते. होय, तीच ती ऐश्वर्या रायसारखी दिसणारी,स्नेहा उल्लाल. गेल्या चार वर्षांपासून स्रेहा बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. कुठल्याही चित्रपटात नाही. स्नेहाने बॉलिवूडपासून अचानक दूर होण्यामागे काय , असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. अलीकडे एका मुलाखतीत स्नेहाला हाच प्रश्न विचारण्यात आला. यावर स्नेहाने तिच्या बॉलिवूडपासून दूर होण्यामागचे खरे कारण सांगितले. तिचे कारण ऐकून मनात एकदम चर्र झाले. 
गेल्या चार वर्षांत स्नेहाला एका आजाराने ग्रासले होते. यात ती न अधिक चालू शकत होती, ना अधिक वेळ उभी राहू शकत होती. स्नेहा आॅटोइम्यून डिसआॅर्डरने पीडित होती. हा एक रक्तासंदर्भातील आजार आहे. यामुळे स्नेहा प्रचंड अशक्त झाली होती. इतकी की, खूप वेळ आपल्या पायांवर उभीही राहू शकत नव्हती. त्याचमुळे ती चित्रपटांपासून दूर राहिली.

२००५ मध्ये सलमान खानने स्रेहाला ब्रेक दिला होता. ‘लकी- नो टाईम फॉर लव्ह’ या चित्रपटातून स्नेहाने सलमानसोबत डेब्यू केला होता. पण यानंतर स्रेहा बॉलिवूडमध्ये फार कमाल दाखवू शकली नाही. २००६ मध्ये सोहेल खानसोबत ‘आर्यन’मध्ये ती झळकली. यानंतर २०१० मध्ये ‘क्लिक’ या चित्रपटात श्रेयस तळपदेसोबत दिसली. पण हे दोन्ही चित्रपट दणकून आपटले. यानंतर स्नेहा साऊथच्या चित्रपटांकडे वळली. तेलगू व कन्नड चित्रपटांत ती दिसली. पण त्यानंतर गत चार वर्षांपासून ती अचानक  चित्रपटांपासून दूर झाली. अर्थात आजारपणामुळे. पण आता स्रेहा बॉलिवूडमध्ये काम करण्यास तयार आहे. निश्चितपणे आपल्या सगळ्यांना तिच्या नव्या चित्रपटाची प्रतीक्षा असेल.

Web Title: Salman Khan's Heroine Sneha Ullal was suffering from 'this' serious illness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.