सलमान खानचा ‘दबंग3’ येणार...‘सन्नी’ करणार ‘मुन्नी’वर मात !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 13:02 IST2017-10-26T07:32:21+5:302017-10-26T13:02:21+5:30
आजचा दिवस सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन उगवला. होय, तुमचा आमचा लाडका भाईजान ‘दबंग3’ घेऊन येतो आहे. ...

सलमान खानचा ‘दबंग3’ येणार...‘सन्नी’ करणार ‘मुन्नी’वर मात !!
आ चा दिवस सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन उगवला. होय, तुमचा आमचा लाडका भाईजान ‘दबंग3’ घेऊन येतो आहे. अरबाज खानने ‘दबंग3’च्या स्क्रिप्टवर काम सुरु केले आहे. केवळ एवढेच नाही तर पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत या चित्रपटाचे शूटींगही सुरु होणार आहे. त्यामुळेच ‘दबंग3’ येणार म्हटल्यावर सलमानच्या चाहत्यांना आनंद होणे साहजिक आहे. या आनंदाच्या बातमीत आम्हीही थोडी भरही घालणार आहोत. कुठली तर ‘दबंग3’मध्येही ‘मुन्नी बदनाम’ सारखे एक धम्माल आयटम साँग असणार आहे. पण या आयटम साँगमध्ये ‘मुन्नी’ नाही तर ‘सन्नी’ असणार आहे. होय, म्हणजेच मलायका अरोरा नाही तर सनी लिओनी असणार आहे.
![]()
अरबाज व सनी लिओनीचा ‘तेरा इंतजार’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. याच चित्रपटाच्या ट्रेलर रिजीज इव्हेंटदरम्यान खुद्द अरबाजने ही माहिती दिली. ‘दबंग3’मध्ये सनी लिओनीकडून ‘मुन्नी बदनाम हुई’सारखे आयटम साँग करणे आवडेल का? असे अरबाजला यावेळी विचारण्यात आले. यावर का नाही? असे उत्तर अरबाजने दिले. तो इथेच थांबला नाही तर ‘सनीला मुन्नी का म्हणून बनवायचे? सनीला आयटम साँग करायचे असेल तर आम्ही तिला काही नवे आॅफर करू,’ असेही अरबाज म्हणाला. आता याचा अर्थ स्पष्ट आहे. ‘दबंग3’मध्ये सनी लिओनी आयटम साँग करणार असेल तर मलायकाचा पत्ता कट होणार, असे समजायचे. आता ‘मुन्नी’च्या ‘सन्नी’ लोकांना किती भावते किती नाही? ‘सन्नी’ ‘मुन्नी’वर कशी मात करते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, या बातमीवर ‘मुन्नी’ कशी रिअॅक्ट करते, हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.
ALSO READ: सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा कॅटरिना कैफच्या दिमतीला!
तूर्तात तरी ‘दबंग3’साठी केवळ सलमान खानचे नाव फायनल आहे. पण सलमानची हिरोईन कोण बनणार? ‘मुन्नी’ची जागा कोण घेणार? याकडे आमचे लक्ष राहणार आहे. हा चित्रपट एमी जॅक्सनला आॅफर झाल्याची बातमी मध्यंतरी आली होती. अर्थात एमीने अद्याप काहीही कन्फर्म केलेले नाही. तूर्तास सलमान खान ‘रेस3’मध्ये बिझी आहे. याशिवाय ‘टायगर जिंदा है’च्या प्रमोशनमध्येही तो व्यस्त आहे.