सलमान खानच्या दबंग 3मध्ये दिसणार मलायका अरोरा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 15:55 IST2017-10-27T10:25:13+5:302017-10-27T15:55:13+5:30
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आगामी चित्रपट दबंग 3च्या शूटिंगसाठी तयार आहे. या चित्रपटाच्या शूटिंग जानेवारी महिन्यात सुरु करण्यात येण्याची ...

सलमान खानच्या दबंग 3मध्ये दिसणार मलायका अरोरा !
ब लिवूड अभिनेता अरबाज खान आगामी चित्रपट दबंग 3च्या शूटिंगसाठी तयार आहे. या चित्रपटाच्या शूटिंग जानेवारी महिन्यात सुरु करण्यात येण्याची शक्यता आहे. या चित्रपटातील चुलबुल पांडे ही सलमान खानने साकारलेली भूमिका तर हिट झाली पण त्याचसोबत सलमानसोबत मुन्नी सुद्धा हिट झाली आहे अर्थात मलायका अरोरा. अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटानंतर याचित्रपटात मलायकाला घेण्यात येणार नाही अशी चर्चा रंगली होती. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. अरबाजचे म्हणणे आहे की या भूमिकेसाठी मलायका शिवाय दुसरी कोणतीच अभिनेत्री फिट नाही बसू शकते.
दबंग सीरीजच्या पुढच्या चित्रपटाची जे फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी एक गुडन्युज आहे. हे आता जवळपास कंफर्म झाले आहे की मलायका या चित्रपटात दिसणार आहे. आता हे बघावे लागले की यावेळी हि मलायका आयटम साँग करणार कि अभिनय. आतापर्यंत दंबग सीरीजचे सगळे चित्रपट हिट झाले आहेत. सध्या सलमान खान त्याचा आगमी चित्रपट टायगर जिंदा है च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर तो रेमो डिसूझाच्या रेस 3च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. रेस 3च्या शूटिंगनंतर सलमान खान दबंगकडे वळणार आहे.
अरबाज खानचा तेरा इंतजार चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्यासोबत सनी लिओनी झळकणार आहे. चित्रपटात सनी लिओनी एक वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. सनी आणि अरबाजची केमिस्ट्री पहिल्यांदाच प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये दोघांचेही बोल्ड व किसींग सीन्सची भरमार आहे. हा चित्रपटाची कथा 2004मध्ये आलेल्या टार्जन -द वंडर कारशी मिळतीजुळती आहे. पण काही लोक अरबाजची हत्या करतात आणि सनीला त्रास देणे सुरु करतात. यानंतर अरबाजची आत्मा सनी लिओनीला सोबत करते आणि सगळ्यांचा सूड घेते, अशी या चित्रपटाची कथा असल्याचे कळतेय.
ALSO RAED : ‘बेबी डॉल’ सनी लिओनी व अरबाज खानच्या ‘तेरा इंतजार’चा ट्रेलर तुम्ही पाहिलातं?