​सलमान खानच्या कोर्ट केसेसमुळे कुटुंबावर ओढवले होते आर्थिक संकट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 15:29 IST2017-06-15T09:59:21+5:302017-06-15T15:29:21+5:30

सलमान खान बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रीय स्टार्सपैकी एक आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सलमानला त्याच्या चाहत्यांचे प्रेम मिळाले आहे. पण एक ...

Salman Khan's court case was a family crisis! | ​सलमान खानच्या कोर्ट केसेसमुळे कुटुंबावर ओढवले होते आर्थिक संकट!

​सलमान खानच्या कोर्ट केसेसमुळे कुटुंबावर ओढवले होते आर्थिक संकट!

मान खान बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रीय स्टार्सपैकी एक आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सलमानला त्याच्या चाहत्यांचे प्रेम मिळाले आहे. पण एक काळ असाही होता, जेव्हा सलमानमुळे त्याच्या कुटुंबाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागला होता. होय, सलमानच्या कोर्ट केसेसमुळे खान कुटुंबावर ही वेळ ओढवली होती. स्वत: सलमानने एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली.
कधी हिट अ‍ॅण्ड रन केस, कधी काळवीट शिकार प्रकरण तर कधी आर्म्स अ‍ॅक्ट प्रकरण या कोर्ट केसेसनी सलमानला हैरान करून सोडले होते. याबद्दल सलमान मुलाखतीत मनापासून बोलला. प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो. पण म्हणून त्यामुळे तुम्ही आयुष्यभर वाईट मनुष्य ठरता का? माझ्यावर जाणीवपूर्वक आरोप लावले गेलेत. या काळात अनेक लोक मला सोडून गेले. तुम्ही काहीही केलेले नसताना लोक तुमच्यापासून दूर जातात, हे सहन करणे खूप कठीण होते. हे चुकीचे आहे. कोर्ट प्रकरणांनी माझ्यावर अनेक वाईट आरोप झालेत. २० वर्षे हा खूप मोठा कालखंड आहे. या काळात माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर काय काय परिस्थिती ओढवली. आम्हाला कुठल्या त्रासातून जावे लागले, हे मी शब्दांत सांगू शकणार नाही. केवळ माझ्या या कोर्ट प्रकरणांमुळे माझ्या कुटुंबाला आर्थिक तंगी सुद्धा सहन करावी लागली, असे सलमानने यावेळी सांगितले.
कालांतराने मी हिट अ‍ॅण्ड रन केसमधून सुटलो. पण माझ्या आयुष्याचे २० वर्षे निघून गेलेत. ती २० वर्षे कधीच परत येणार नाहीत. त्या काळातील जखमा कधीही भरून येणार नाहीत. या काळात मी काही कॉमेडी शो केलेत. काही मुलींवर प्रेम करून पाहिले. पण त्यामुळेही मला बदनामीच सहन करावी लागली. पण आता मला अशा गोष्टींमुळे काहीही फरक पडत नाही. आता मी माझ्या कामात बिझी असतो आणि वेळ मिळाला की, कुटुंबासोबत घालवतो, असेही सलमान म्हणाला.

Web Title: Salman Khan's court case was a family crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.