सलमान खानची कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूरची ‘या’ क्रिकेटपटूसोबत वाढली जवळिकता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 19:08 IST2017-12-19T13:34:40+5:302017-12-19T19:08:07+5:30

दर महिन्याला बॉलिवूडचा दबंग सलमान खान कुठल्या ना कुठल्या मुलीच्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या समोर येत असतात. मात्र सलमान खान ...

Salman Khan's alleged girlfriend Ulya Vantoor's 'close' with the cricketer! | सलमान खानची कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूरची ‘या’ क्रिकेटपटूसोबत वाढली जवळिकता!

सलमान खानची कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूरची ‘या’ क्रिकेटपटूसोबत वाढली जवळिकता!

महिन्याला बॉलिवूडचा दबंग सलमान खान कुठल्या ना कुठल्या मुलीच्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या समोर येत असतात. मात्र सलमान खान स्वत:हून कधीही अशाप्रकारच्या बातम्यांना दुजोरा दिला नाही. आता हेच बघा ना काहीकाळापर्यंत सलमान खानची गर्लफ्रेंड असल्याचे बोलले जात असलेल्या यूलिया वंतूरबद्दल त्याच्यासोबतच्या बातम्या येणे आता बंद झाले आहे. कारण पुन्हा एकदा तो आणि कॅटरिनाच्या जवळिकतेच्या बातम्या कानी पडत आहेत. मात्र सलमानसोबत यूलियाच्या बातम्या येणे बंद झाले असले तरी यूलिया आणि तिचा नव्या बॉयफ्रेंडच्या बातम्या मात्र सातत्याने समोर येत आहेत. होय, सलमान खानची कथित एक्स गर्लफ्रेंड असलेली यूलिया सध्या एका माजी भारतीय क्रिकेटपटूच्या प्रेमात पडल्याची चर्चा आहे. हा क्रिकेटपटू एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता. 

कदाचित तुम्हाला हे नाव लक्षात आले असेल? होय, आम्ही माजी कर्णधार मोहम्मद अजहरूद्दीन याच्याबद्दल बोलत आहोत. स्पॉटबॉय या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार यूलिया सध्या अजहरुद्दीनच्या संपर्कात आहे. अजहरूद्दीन सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी हिचा एक्स पती आहे. सध्या अजहर आणि यूलिया दोघेही दुबई येथे असून, हे दोघे सलमानचा भाऊ सोहेल खानच्या ‘मराठा अरबेनियन्स’ या टी-१० लीग क्रिकेट टीमला सपोर्ट करीत आहेत. स्पॉटबॉयच्या माहितीनुसार, या इव्हेंटमध्ये दोघांनी चांगलाच एन्जॉय केला आहे. रंगलेल्या पार्ट्यांमध्ये धमालही केली आहे. त्यामुळे दोघांमध्ये जवळिकता निर्माण झाली आहे. 



दरम्यान, सलमान आणि यूलिया या दोघांनी बºयाच काळापासून ते विभक्त झाल्याच्या चर्चेला दुजोरा दिला नव्हता. परंतु यूलियाने एका मुलाखतीदरम्यान अशा काही गोष्टी सांगितल्या, ज्यावरून तिने थेट सलमान आणि त्याच्या परिवारावर निशाणा साधला होता. यूलियाच्या काही वक्तव्यांवरून असादेखील अंदाज वर्तविला जात आहे की, ती सलमानच्या परिवारात स्वत:ला अ‍ॅडजस्ट करण्यात अपयशी ठरली आहे. यूलियाने रोमानियन मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, मी हिंदीत गाणे म्हणायला शिकले आहे. वास्तविक भारतात सर्व काही वेगळे असताना मी ते शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण येथील लोकांची विचार करण्याची पद्धत, सभ्यता सर्व काही वेगळे आहे. भारतात ज्यास्त प्रायव्हसी नाही. कारण एकच घरात बरेचसे लोक राहतात.’ यूलियाच्या या वक्तव्यानंतर तिला सलमानच्या घरात स्वत:ला अ‍ॅडजस्ट करून घेण्यात अडचण येत असाव्यात असा अंदाज लावला जात आहे. 

Web Title: Salman Khan's alleged girlfriend Ulya Vantoor's 'close' with the cricketer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.