‘जुडवा २’मध्ये दिसणार सलमानचा केमिओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 10:01 IST2016-11-09T18:10:47+5:302016-11-10T10:01:31+5:30
बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खानचा सुपरहिट चित्रपट ‘जुडवा’च्या सिक्वेलची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘जुडवा २’मध्ये सलमानने साकारलेली भूमिका वरुण ...

‘जुडवा २’मध्ये दिसणार सलमानचा केमिओ!
१९९७ साली दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या सुपरहिट चित्रपटात सलमान खानने दुहेरी भूमिका केली होती. तब्बल १९ वर्षांनंतर याच चित्रपटाचा सिक्वल पुन्हा तयार करण्यात येत असून, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी साजिद-फरहाद या जोडीवर सोपविण्यात आली आहे. यात वरुण धवन हा दुहेरी व प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात सलमान खान याची भूमिका असणार असल्याची माहिती मिळतेय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमानची भूमिका वरुणचा गॉडफादरच्या रुपात असू शकते. जुडवामध्ये सभ्य व गुंड अशा दोन भूमिका होत्या. त्यापैकी सलमान गुंड असलेल्या वरुणचा गॉडफॉदर असेल. या सोबतच जुडवा मधील ‘टन टना टन टन टन टारा...’ हे गाणे देखील असणार आहे. यासाठी साजिद नाडियाडवाला, डेव्हिड धवन व साजिद-फरहाद यांच्यात चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
या चित्रपट लवकरात लवकर फ्लोअरवर यावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मुख्य भूमिकेत वरुण धवन दिसणार असला तरी त्याच्या अपोझिट असलेल्या नायिकांची नावे अद्याप फायनल झाली नाहीत. जॅकलिन फर्नाडिझ, आलिया भट्ट व श्रद्धा कपूर यांची नावे या चित्रपटासाठी स्पर्धेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सलमान खान अभिनित जुडवा हा चित्रपट जॅकी चॅनचा ट्विन ड्रॅगनचा रिमेक होता. जुडवाचा हॅलो ब्रदर नावाने दाक्षिणात्य भाषेत रिमेक करण्यात आला होता. आता पुन्हा त्याचा सिक्वल करण्यात येत आहे हे विशेष.