एक किलोमीटर धावत येऊन सलमान खानने वाचविले होते दिया मिर्झाच्या आईचे प्राण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 20:47 IST2017-10-08T15:16:58+5:302017-10-08T20:47:37+5:30

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याचे नाव चित्रपट हिट करण्यासाठी पुरेसे आहे. सलमान खान हे नाव जेवढे अभिनयासाठी ओळखले जाते, ...

Salman Khan was saved for a minute and saved the life of Mirza's mother! | एक किलोमीटर धावत येऊन सलमान खानने वाचविले होते दिया मिर्झाच्या आईचे प्राण!

एक किलोमीटर धावत येऊन सलमान खानने वाचविले होते दिया मिर्झाच्या आईचे प्राण!

लिवूडचा भाईजान सलमान खान याचे नाव चित्रपट हिट करण्यासाठी पुरेसे आहे. सलमान खान हे नाव जेवढे अभिनयासाठी ओळखले जाते, तेवढेच त्याच्या मोठ्या मनासाठीही ओळखले जाते. सलमानला बी-टाउनचा गॉडफादर असे म्हटले जाते. कारण सलमानने बºयाचशा अभिनेता, अभिनेत्री आणि कम्पोजरला इंडस्ट्रीमध्ये संधी दिली. त्यापैकीच एक नाव अभिनेत्री दिया मिर्झाचे आहे. दिया मिर्झाला इंडस्ट्रीत सलमानेच आणले. सलमानने केवळ दियाला इंडस्ट्रीत प्रवेश दिला असे नाही तर, संकटकाळातही तिच्यासाठी तो धावून गेला. याबाबतची एक घटना दियानेच स्वत: ट्विटच्या माध्यमातून सांगितली होती. 

२००० या वर्षी दियाने मिस इंडिया एशिया पॅसिफिकचा किताब मिळविला. याच कार्यक्रमात दियाला मिस ब्युटिफूल स्माइल, द सोनी च्वॉइस अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले. त्यानंतर दियाने बॉलिवूडकडे येण्यास सुरुवात केली. दियाने ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तिच्या अपोझिट आर. माधवन बघावयास मिळाला. वास्तविक या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल दाखविली नाही, परंतु चित्रपटाच्या संगीताने आजही प्रेक्षकांवर मोहिनी घातलेली आहे. त्यानंतर दियाने ‘दिवानापन’ आणि सलमान खानसोबत ‘तुमको न भूल पाएंगे’ या चित्रपटांमध्ये काम केले. 



खरं तर दिया मिर्झाला बी-टाउनमध्ये प्रवेश देण्याचे पूर्ण श्रेय सलमान खान यालाच जाते. ही बाब स्वत: दियानेच एक ट्विट करून सांगितली होती. त्याचबरोबर तिने एक किस्साही ट्विटच्या माध्यमातून सांगितला. तिने लिहिले की, सलमान खाननेच माझ्या आईचे प्राण वाचविले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दियाच्या आईची तब्येत अचानक बिघडली होती. त्या बेशुद्ध पडल्या होत्या. घाबरलेल्या दियाने लगेचच सलमानला फोन केला. त्यावेळी सलमानचे घर दियाच्या घरापासून काही अंतरावरच होते. तो तब्बल एक किलोमीटर पळत दियाच्या घरी आला अन् तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था केली. 

Web Title: Salman Khan was saved for a minute and saved the life of Mirza's mother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.