ऐश्वर्याबरोबर ब्रेकअपनंतर सलमानची झालेली 'अशी' अवस्था, रवी किशनचा खुलासा, म्हणाला, "तेरे नाम'च्या वेळी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 15:35 IST2023-10-07T15:34:26+5:302023-10-07T15:35:10+5:30
ऐश्वर्याबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सलमानची अवस्था फार वाईट झाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता रवी किशनने याबाबत खुलासा केला आहे.

ऐश्वर्याबरोबर ब्रेकअपनंतर सलमानची झालेली 'अशी' अवस्था, रवी किशनचा खुलासा, म्हणाला, "तेरे नाम'च्या वेळी..."
बॉलिवूड कलाकारांच्या अफेअरचे किस्से हा कायमच चर्चेचा विषय असतो. बॉलिवूडमधील करिअरमध्ये सलमान खानचं नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं होतं. भाईजान आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचं प्रेमप्रकरण प्रचंड गाजलं होतं. पण, काही कारणांमुळे सलमान खान आणि ऐश्वर्या रायचं ब्रेकअप झालं. ऐश्वर्याबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सलमानची अवस्था फार वाईट झाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता रवी किशनने याबाबत खुलासा केला आहे.
रवी किशनने नुकतंच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या ऐश्वर्याबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सलमानच्या अवस्थेबाबत खुलासा केला. ऐश्वर्याबरोबर ब्रेकअप झालं तेव्हा सलमान 'तेरे नाम'चं शूटिंग करत होता. शूटिंगच्या वेळी सलमानची फार वाईट अवस्था झाली होती. याबाबत रवी किशन म्हणाला, "सलमान तेव्हा खूप वाईट परिस्थितीतून जात होता. तो त्याच्याच धुंदीत असायचा. मला वाटतं, त्यामुळेच तेरे नाममध्ये त्याचा पर्फॉमन्स फारच चांगला झाला."
"सलमान खान फारच चांगला व्यक्ती आहे. तेरे नामच्या वेळी सलमान ज्या परिस्थितीतून जात होता, ते मी स्वत:पाहिलं आहे. तेव्हा तो दीड दोन तास जीममध्ये असायचा. पूर्ण दिवस शूटिंग करुनही तो जीमसाठी वेळ काढायचा," असंही पुढे त्याने सांगितलं.
'तेरे नाम' चित्रपटात रवी किशन महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. २००३ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याआधीच २००२मध्ये सपलमान आणि ऐश्वर्याचं ब्रेकअप झालं होतं. संजय लीला भन्साळींच्या 'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर ते पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते.