​सलमानने घडवून आणले विराट-अनुष्काचे पॅचअप??

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 18:59 IST2016-04-08T01:54:47+5:302016-04-07T18:59:55+5:30

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या ब्रेकअपच्या बातम्या कानावर पडत असतानाच, काल रात्री हे दोघेही मोस्ट चार्मिंग कपल मुंबईच्या ...

Salman Khan, Virat Anushka's Patched Up! | ​सलमानने घडवून आणले विराट-अनुष्काचे पॅचअप??

​सलमानने घडवून आणले विराट-अनुष्काचे पॅचअप??

राट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या ब्रेकअपच्या बातम्या कानावर पडत असतानाच, काल रात्री हे दोघेही मोस्ट चार्मिंग कपल मुंबईच्या रॉयल्टी क्लबमध्ये लेट नाईट डिनर डेटवर एकत्र दिसले. अनुष्का व विराटला खूप दिवसांनंतर असे एकत्र बघून दोघांच्याही चाहत्यांच्या ओठांवर हसू आले नसेल तर नवल...ही किमया कशी घडली, हे कोडे होते. पण एका ताज्या बातमीनुसार, सलमान खान याने या लव्हस्टोरीत कामदेवतेची भूमिका साकारली. सलमाननेच अनुष्का व विराटचे पुन्हा पॅचअप घडवून आणले. आता तुम्ही म्हणाल, याला पुरावा काय? तर विविध आॅनलाईन पोर्टलनी दिलेल्या माहितीनुसार, डिनर डेट एन्जॉय केल्यानंतर अनुष्का व विराट सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमधील घरी गेले. सध्या अनुष्का सलमानसोबत ‘सुल्तान’मध्ये काम करत आहे. त्यामुळेच सलमाननेच अनुष्का व विराटच्या प्रेमकहानीत पुन्हा रंग भरले, असे मानायला जागा आहे आणि खरेच असे असेल तर सलमानचे आभार मानायलाच हवेत, होय ना!!

Web Title: Salman Khan, Virat Anushka's Patched Up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.