सलमान खानने मीडियाला सांगितले, ‘कॅटरिनाने मला ‘हे’ गिफ्ट दिले’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 20:47 IST2017-12-27T15:15:33+5:302017-12-27T20:47:23+5:30

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याने त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने एक दिवस अगोदरच त्याच्या पनवेल येथील ...

Salman Khan told the media, 'Katrina gave me this gift' !! | सलमान खानने मीडियाला सांगितले, ‘कॅटरिनाने मला ‘हे’ गिफ्ट दिले’!!

सलमान खानने मीडियाला सांगितले, ‘कॅटरिनाने मला ‘हे’ गिफ्ट दिले’!!

लिवूडचा दबंग सलमान खान याने त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने एक दिवस अगोदरच त्याच्या पनवेल येथील फार्महाउसमध्ये एक ग्रॅण्ड पार्टी दिली. पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यामध्ये सलमानची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफदेखील बघावयास मिळाली. जेव्हा सलमानने मीडियाशी बातचीत केली तेव्हा ‘कॅटरिनाने काय गिफ्ट दिले? असे त्याला विचारण्यात आले. सलमाननेही अतिशय बिंधास्तपणे या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला असताना यापेक्षा दुसरे मोठे गिफ्ट कोणते असू शकते. 

दरम्यान, सलमानने मीडियाला सांगितले होते की, यावर्षी तो कुठल्याही प्रकारची पार्टी करणार नाही. त्याचबरोबर बर्थ डे सेलिब्रेशनही करणार नाही. परंतु त्याने सरप्राइज देत या पार्टीचे आयोजन केले. सलमानच्या बर्थ डे पार्टीविषयी जेव्हा अभिनेत्री स्नेहा उलाल हिला विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, सलमान खरोखरच कुठलीही पार्टी देऊ इच्छित नव्हता. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्याने हा प्लान केला. मलाही दोन दिवसांपूर्वीच त्याने इन्व्हाइट केले. जवळपास ७५ सेलिब्रिटी पार्टीत उपस्थित होते. 



रात्री सुरू झालेल्या या पार्टीत सलमानने केक कटिंग सेरेमनी केली नाही. स्नेहाने सांगितले की, सलमानची बहीण अर्पिता खान डिजर्ट आणि केकची प्रचंड शौकीन आहे. दरवर्षी तिच सलमानच्या बर्थ डेचा केक च्वॉइस करीत असते. यावेळेसदेखील केक आणण्यात आला होता, परंतु ते कापला नाही. सलमान गेस्टसोबत खूप बिझी होता. त्यामुळे केक कापणे तो विसरला. अन्यथा १२ वाजताच केक कापला गेला असता. 

स्नेहाने पुढे सांगितले की, सलमानने पार्टीत गेस्टकरीता पूल टेबल ठेवण्यात आला होता. त्यामुळे पार्टीत उपस्थित असलेले बहुतांश गेस्ट आपल्या संधीच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. 

Web Title: Salman Khan told the media, 'Katrina gave me this gift' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.