सलमानने खानने गाणे गाताच चाहतीला अश्रू झाले अनावर, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 14:03 IST2017-12-31T08:33:20+5:302017-12-31T14:03:20+5:30

सलमान खानच्या चाहत्यांची संख्या जगभरात असून, तो त्याच्या चाहत्यांप्रती नेहमीच भावुक असल्याचे दिसून आले आहे. एका चाहतीसाठी त्याने गाणे गाताच तिला अश्रू अनावर झाले.

Salman Khan sings song, tears in tears, watch video! | सलमानने खानने गाणे गाताच चाहतीला अश्रू झाले अनावर, पाहा व्हिडीओ!

सलमानने खानने गाणे गाताच चाहतीला अश्रू झाले अनावर, पाहा व्हिडीओ!

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाºयांच्या यादीत सलमान तिसºया क्रमांकावर आहे. अशा या मेगास्टारची जर तुम्हाला झलक बघायला मिळाली तर? असाच काहीसा अनुभव सलमानच्या एका चाहतीला घेता आला. सलमानला भेटावे असे दिवसा स्वप्न बघणाºया या चाहतीसमोर अचानकच दस्तुरखुद्द सलमान उभा राहिला अन् तिच्यासाठी त्याने चक्क गाणेही गायिले. त्यामुळे ही चाहती एवढी भावुक झाली होती की, तिला स्वत:चे अश्रू आवरता आले नाहीत. 

बॉलिवूड नाऊच्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, त्यामध्ये सलमान त्याच्या एका चाहतीसाठी गाणे गाताना दिसत आहे. सलमानने त्याच्या या क्यूट फ्रेंडसाठी ‘मै हूं हीरो तेरा’ हे गाणे गायिले. त्यामुळे ती एवढी भावुक झाली की तिला तिचे अश्रू आवरता आले नाहीत. पुढे या चाहतीने सलमानला मिठी मारली. सलमानने हसत हसत तिला जवळ केले. 

वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास सलमान खानचा नुकताच ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. वर्ल्डवाइज आकड्यांनुसार चित्रपटाने ३०० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे, तर बॉक्स आॅफिसवर दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. चित्रपटात सलमानने रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. याव्यतिरिक्त सलमान ‘रेस-३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर ‘दबंग-३’वरही तो काम करीत असल्याचे समजते. 

Web Title: Salman Khan sings song, tears in tears, watch video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.