​सलमान खानला आठवला तुरुंगातील तो भावूक क्षण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 15:10 IST2017-05-26T09:40:48+5:302017-05-26T15:10:48+5:30

सलमान खान चित्रपटांत रफटफ भूमिका साकारत असला तरी रिअल लाईफमध्ये तो अतिशय भावूक आहे. काल त्याच्या ‘टयुबलाईट’ या आगामी ...

Salman Khan remembers the emotional moment in jail! | ​सलमान खानला आठवला तुरुंगातील तो भावूक क्षण!

​सलमान खानला आठवला तुरुंगातील तो भावूक क्षण!

मान खान चित्रपटांत रफटफ भूमिका साकारत असला तरी रिअल लाईफमध्ये तो अतिशय भावूक आहे. काल त्याच्या ‘टयुबलाईट’ या आगामी सिनेमाचे ट्रेलर लॉन्च झाले. यावेळी त्याने चित्रपटाशी संबंधित अनेक किस्से शेअर केलेत. या चित्रपटात सलमानचा लहान भाऊ सोहेल खानही आहे. या चित्रपटात सलमानने अतिशय रिअल इमोशन दिले आहेत. होय, कारण चित्रपटाचे डबिंग सुरु असताना अनेक सीन्समध्ये सलमान प्रत्यक्ष रडलाय. डबिंगदरम्यान भावूक प्रसंग आला रे आला की, सलमानचे डोळे भरून यायचे. त्याना भावना नियंत्रित करणे कठीण व्हायचे. खुद्द सलमानने ही गोष्ट शेअर केली. एवढेच नाही तर एक रिअल लाईफ प्रसंगही सांगितले. हा किस्सा आहे, सलमान तुरुंगात असताना. याबद्दल सांगताना सलमान म्हणाला, तुरुंगात असताना माझे बाबा, आई आणि काका मला भेटण्यासाठी कारागृहात आले होते. काकांनी मला  कसा आहेस? असे विचारले. त्यावर , मी मजेत आहे. हा फक्त ‘वन बेडरुम सूट’ आहे, छान आहे, असे मी म्हणालो. माझे ते शब्द ऐकून माझे काका हुमसून हुमसून रडू लागले.  पण काकांना रडताना पाहून माझे बाबा त्यांना म्हणाले, अरे तू कसला पठाण आहेस? पठाण कधी रडत नसतात. तो प्रसंग खूप भावूक होता. हा रिअल लाईफ प्रसंग सांगतानादेखील सलमान भावूक झालेला दिसला. कदाचित कारागृहात घालवलेला दोन   काळ त्याला आठवला असेल.

ALSO READ : ​‘ट्युबलाईट’च्या ट्रेलरमधील ‘या’ गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले?

कबीर खान दिग्दर्शित ‘टयुबलाईट’ या चित्रपटामध्ये सलमान आणि सोहेल हे दोघंही सात वर्षांनंतर स्क्रीन शेअर करत आहेत.  हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर  प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Salman Khan remembers the emotional moment in jail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.