'टायगर जिंदा है' मध्ये सलमान खानने कॅटरिना कैफला किस करण्यासाठी दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 16:50 IST2017-11-07T11:19:32+5:302017-11-07T16:50:03+5:30

बहुप्रतिक्षित चित्रपट टायगर जिंदा है चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आज आला आहे. बजरंगी भाईजान आणि ट्युबलाईट सारखे सोफ्ट चित्रपट ...

Salman Khan refused to give to Katrina Kaif to 'Tiger is alive' | 'टायगर जिंदा है' मध्ये सलमान खानने कॅटरिना कैफला किस करण्यासाठी दिला नकार

'टायगर जिंदा है' मध्ये सलमान खानने कॅटरिना कैफला किस करण्यासाठी दिला नकार

ुप्रतिक्षित चित्रपट टायगर जिंदा है चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आज आला आहे. बजरंगी भाईजान आणि ट्युबलाईट सारखे सोफ्ट चित्रपट केल्यानंतर सलमान खान पुन्हा एकदा एक्शनमध्ये दिसणार आहे. तब्बल पाच वर्षानंतर सलमान आणि कॅटरिनाची केमिस्ट्री पाहण्यासाठी दोघांचे फॅन्स खूपच उत्सुक आहेत. हा चित्रपट एक था टायगरचा सीक्वल आहे. टायगर जिंदा है च्या शूटिंग दरम्यान दोघांमधील जवळीकता वाढल्याची बरीच चर्चा रंगली होती. असे ही ऐकायला मिळत होते की या चित्रपट सलमान कॅटरिनाला किस करताना दिसणार असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान असे काही ही करताना दिसणार नाही आहे.   

सलमानने आतापर्यंत कोणत्याच अभिनेत्रीला ऑनस्क्रिन किस नाही केले आहे. कोणताही चित्रपट साईन करण्यापूर्वी सलमान खान ही गोष्ट दिग्दर्शकासोबत क्लिअर करुन घेतो. सगळ्यांना वाटले होते सलमान ऑनस्क्रिन अभिनेत्रीला किस न करण्याचा नियम या चित्रपटासाठी बाजूला ठेवले मात्र सलमानने किस करण्यासाठी नकार दिला. सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जफरने सलमानचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र सलमान आपल्या निर्णयावर ठाम राहिला. शेवटी मेकर्सने चित्रपटातून हे दृश्य काढून टाकण्याचा निर्णय घेतला. 

ALSO READ :  जबरदस्त अ‍ॅक्शन; दमदार डायलॉग ! ‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर आला!!

सलमान आपल्या चित्रपटातील हिरोन्ससोबत भरपूर रोमान्स करताना दिसतो मात्र तो कधीच त्यांना किस करताना दिसत नाही.सलमान चित्रपटात किसिंग सीन का देत नाही यामागे एक कारण आहे. 'मैने प्यार किया' चित्रपटात सलमानला भाग्यश्रीला किस करायचे होते मात्र तो त्यासाठी तिने नाकारला दिला. शेवटी निर्मात्यांनी दोघांमध्ये एक काच ठेवून कसा बसा हा सीन पूर्ण केला. त्यानंतर सल्लू मियाँने चित्रपटात किसिंग सीन कधीही न देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी घेतलेल्या निर्णयावर तो आज ही कायम आहे. चित्रपटाची कथा वाचल्यानंतर तो मेकर्सना स्पष्टपणे सांगतो की चित्रपटात किसिंग सीन नसावा. 

Web Title: Salman Khan refused to give to Katrina Kaif to 'Tiger is alive'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.