'टाइगर ३'साठी सलमान खाननं घेतलं इतक्या कोटींचं मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 01:13 PM2023-11-07T13:13:11+5:302023-11-07T13:13:37+5:30

Tiger 3 : सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर ३' चित्रपटगृहांमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. यशराज बॅनरखाली बनलेल्या या बिग बजेट चित्रपटासाठी सलमान खानने तगडं मानधन घेतलं आहे.

Salman Khan received so many crores for 'Tiger 3', you will be shocked to read the figure | 'टाइगर ३'साठी सलमान खाननं घेतलं इतक्या कोटींचं मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

'टाइगर ३'साठी सलमान खाननं घेतलं इतक्या कोटींचं मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

सलमान खान(Salman Khan)चे चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतात. जेव्हा जेव्हा भाईजानचे चित्रपट थिएटरमध्ये दाखवले जातात तेव्हा एकच खळबळ उडते. यावेळीही असेच वातावरण पाहायला मिळत आहे. यंदाचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर ३'(Tiger 3) दिवाळीच्या खास मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. सलमान खानचे चाहतेही या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. दरम्यान, यशराज बॅनरखाली बनलेल्या या बिग बजेट चित्रपटाबाबत आता एक खास माहिती समोर आली आहे. 'टायगर ३'साठी सलमान खानने किती पैसे घेतले याचा खुलासा झाला आहे. कोइमोईच्या रिपोर्टनुसार, भाईजानने टायगर ३ साठी १०० कोटी रुपये मानधन घेतले आहे.

एवढेच नाही तर सलमान खान या चित्रपटाच्या नफ्यातील ६० टक्के वाटादेखील घेणार आहे. यानुसार भाईजानच्या फीची रक्कम जवळपास १०० कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. मात्र, चित्रपटाच्या नफ्यानुसार सलमान खानची फी वाढू किंवा कमी होऊ शकते. चित्रपटाची आगाऊ बुकिंग पाहता टायगर ३ चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणार आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

अ‍ॅडव्हान्स बुकिंगला मिळतोय दमदार प्रतिसाद
चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू झाली असून तिकीटबारीवर झुंबड उडाली आहे. होय, तिकीट खिडकीवर बिनदिक्कतपणे चित्रपटाची तिकिटे विकली जात आहेत. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, चित्रपटाने आधीच आगाऊ बुकिंगमध्ये ४.२ कोटी रुपये कमावले आहेत आणि १४०००० पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या खास मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे.

Web Title: Salman Khan received so many crores for 'Tiger 3', you will be shocked to read the figure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.