शूराबरोबर दुसरं लग्न करण्याआधी सलमानने अरबाजला दिलेला सल्ला, म्हणाला- त्याने ऐकलं असतं तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 12:26 PM2024-01-29T12:26:23+5:302024-01-29T12:27:04+5:30

अरबाजच्या दुसऱ्या लग्नाबाबत पहिल्यांदाच बोलला सलमान खान, म्हणाला - त्याने...

Salman khan on giving advice to Arbaaz khan before his second marriage with shoora khan | शूराबरोबर दुसरं लग्न करण्याआधी सलमानने अरबाजला दिलेला सल्ला, म्हणाला- त्याने ऐकलं असतं तर...

शूराबरोबर दुसरं लग्न करण्याआधी सलमानने अरबाजला दिलेला सल्ला, म्हणाला- त्याने ऐकलं असतं तर...

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अरबाजने काही दिवसांपूर्वीच मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी निकाह करत दुसऱ्यांदा संसार थाटला. अरबाजच्या दुसऱ्या लग्नाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता अरबाजच्या दुसऱ्या लग्नाबाबत सलमान खानने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. 

'बिग बॉस १७'चा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यासाठी अरबाज खान आणि सोहेल खान यांनीही हजेरी लावली होती. कॉमेडियन भारती सिंगने अरबाजच्या दुसऱ्या लग्नाबाबत सलमानला प्रश्न विचारला. भारतीने सलमानलं विचारलं की छोटा भाऊ अरबाजला लग्न करण्याआधी कोणता सल्ला दिला नाही का? यावर सलमानने उत्तर दिलं. तो म्हणाला, "अरबाज कोणाचं ऐकतचं नाही. जर त्याने ऐकलं असतं तर..." सलमानच्या या गमतीशीर उत्तराने सगळ्यांनाच हसू फुटलं. 

अरबाजने ५६व्या वर्षी शूराशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. शूरा अरबाजपेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. तिचं वय ४१ वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अरबाजने १९९८ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर जवळपास १९ वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे. मलायकापासून वेगळं झाल्यानंतर अरबाज जॉर्जिया अँड्रायानीला डेट करत होता. मात्र काही कारणांमुळे त्यांच्याच ब्रेकअप झालं. 

Web Title: Salman khan on giving advice to Arbaaz khan before his second marriage with shoora khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.