भाईजानची चाहत्यांना ईदी! सलमान खानच्या नव्या सिनेमाची शानदार घोषणा, या तारखेला होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:51 AM2024-04-11T11:51:32+5:302024-04-11T11:52:35+5:30

सलमान खानने आज ईदचं औचित्य साधून त्याच्या नवीन सिनेमाची घोषणा केलीय. या सिनेमाबद्दल सविस्तर जाणून घ्या (salman khan, sikandar)

salman khan new movie sikandar announcement directed by a r murugadoss eid 2025 | भाईजानची चाहत्यांना ईदी! सलमान खानच्या नव्या सिनेमाची शानदार घोषणा, या तारखेला होणार रिलीज

भाईजानची चाहत्यांना ईदी! सलमान खानच्या नव्या सिनेमाची शानदार घोषणा, या तारखेला होणार रिलीज

सलमान खान आणि ईद हे समीकरण ठरलेलं. गेल्या अनेक वर्षांपासून भाईजान ईदच्या दिवशी त्याचे सिनेमे रिलीज करतोय. यंदा मात्र भाईजानचा एकही सिनेमा ईदच्या दिवशी रिलीज होत नाहीय. पण सलमानने मात्र ईदच्या दिवशी चाहत्यांना निराश केलं नाही. सोशल मीडियावर सलमानने त्याच्या आगामी सिनेमाची शानदार घोषणा केलीय. त्यामुळे आजच्या खास दिवशी सलमानने त्याच्या चाहत्यांना ईदी दिली आहे असं म्हणता येईल.

सलमानच्या आगामी सिनेमाचं नाव आहे 'सिकंदर'. 'हॉलिडे' फेम दिग्दर्शक ए.आर.मुरगदास या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. 'सिकंदर' सिनेमात सलमान प्रमुख भूमिका साकारणार आहे. या सिनेमाची कथा काय आणि या सिनेमात सलमानसोबत आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.  सलमान खानचा हा नवीन सिनेमा पुढील वर्षी २०२५ च्या ईदमध्ये रिलीज होणार आहे.

प्रसिद्ध निर्माते साजिद नाडियादवाला यांनी या सिनेमाची निर्मिती केली. या सिनेमाचं पोस्टर  शेअर करताना सलमान लिहितो, "यावर्षी ईदमध्ये बडे मिया छोटे मिया आणि मैदान बघा. आणि पुढच्या वर्षी ईदमध्ये सिकंदरला भेटा." अशी पोस्ट लिहून सलमानने सर्वांना ईदच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. आता 'सिकंदर' किती गाजणार हे पुढील काही दिवसांमध्ये कळून येईलच.

Web Title: salman khan new movie sikandar announcement directed by a r murugadoss eid 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.