सलमानच्या घराबाहेर गोळीबार; शत्रुघ्न सिन्हांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले- "जेव्हा मला याबाबत कळालं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 11:20 AM2024-04-16T11:20:32+5:302024-04-16T11:21:52+5:30

Salman Khan House Firing : बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.

salman khan house firing shatrughna sinha angry reaction said its not healthy sign | सलमानच्या घराबाहेर गोळीबार; शत्रुघ्न सिन्हांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले- "जेव्हा मला याबाबत कळालं..."

सलमानच्या घराबाहेर गोळीबार; शत्रुघ्न सिन्हांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले- "जेव्हा मला याबाबत कळालं..."

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर दोन व्यक्तींकडून रविवारी(१४ एप्रिल) सकाळी हवेत गोळीबार करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणामुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती. सलमानच्या चाहत्यांनाही या प्रकरणानंतर काळजी वाटत होती. या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.

टाइम्स नाऊशी बोलताना ते म्हणाले, "सलमान आणि त्याचं कुटुंबीय, त्याचे वडील उत्कृष्ट लेखक सलीम साब माझ्या जवळचे आहेत. जेव्हा रविवारी सकाळी या प्रकरणाबाबत मला कळलं तेव्हा मला त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी वाटत होती. सलीम साब आणि सलमान फिल्म इंडस्ट्रीचा अभिमान आहेत. या भयंकर आणि भ्याड हल्ल्याचा आपण पुढे येऊन निषेध केला पाहिजे. अशाप्रकारे दहशत निर्माण करणं, ही चांगली गोष्ट नाहीये. प्रार्थना आणि आशीर्वाद सलमानला नेहमी सुरक्षित ठेवतील याचा मला विश्वास आहे." 

सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर याबाबत पोलिसांनी FIR दाखल केला असून याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. २४ वर्षीय विक्की साहब गुप्ता आणि २१ वर्षीय सागर जोंगेंद्र पाल अशी त्यांची नावे आहेत. काल रात्री १ वाजता गुजरातच्या कच्छमधील भूज येथून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

पोलिसांच्या रिपोर्टनुसार, हे दोन्ही शूटर्स महिनाभर आधीच मुंबईत आले होते. त्यांनी नवी मुंबईतील पनवेल येथे एक खोली भाड्याने घेतली होती. यानंतर दोघांनी रेकी केली आणि नंतर कृती केली. घटनास्थळाच्या १ किमी अंतरावरुन दुचाकी ताब्यात घेतली. ही दुचाकी रायगडच्या एका पत्त्यावर रजिस्टर होती. ही सेकंड हँड बाईक आहे. दुचाकीच्या मालकाचीही चौकशी केली. याआधीही सलमानला जीवेमारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला धमकीचं पत्रही मिळालं होतं. या हल्ल्यानंतरही लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईने फेसबुक पोस्ट करत गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. 

Web Title: salman khan house firing shatrughna sinha angry reaction said its not healthy sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.