​ सलमान खान विसरला नाही ‘तो’ अपमान! अरिजीत सिंहला पुन्हा दाखवला बाहेरचा रस्ता!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 11:05 IST2018-02-19T05:35:05+5:302018-02-19T11:05:05+5:30

बॉलिवूडचा ‘टायगर’ सलमान खान पुन्हा एकदा संतापला आहे. यावेळी त्याच्या निशाण्यावर अन्य कुणी नसून सिंगर अरिजीत सिंह हाच आहे. ...

Salman Khan has not forgotten 'he' insults! Ariji Singh again showed the exit road !! | ​ सलमान खान विसरला नाही ‘तो’ अपमान! अरिजीत सिंहला पुन्हा दाखवला बाहेरचा रस्ता!!

​ सलमान खान विसरला नाही ‘तो’ अपमान! अरिजीत सिंहला पुन्हा दाखवला बाहेरचा रस्ता!!

लिवूडचा ‘टायगर’ सलमान खान पुन्हा एकदा संतापला आहे. यावेळी त्याच्या निशाण्यावर अन्य कुणी नसून सिंगर अरिजीत सिंह हाच आहे. होय, चर्चा खरी मानाल तर सलमानने पुन्हा एकदा आपल्या एका चित्रपटातून अरिजीतला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सन २०१३ मध्ये सलमान व अरिजीत यांच्यात वाजले होते. यानंतर ‘सुल्तान’ या चित्रपटातील अरिजीतने गायलेले एक गाणे सलमानने ऐनवेळी काढून टाकले होते. यानंतर ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातील अरिजीत सिंहच्या आवाजातील ‘दिल दियां गल्ला’ हे गाणेही सलमानने काढून टाकले होते. पुढे हे गाणे आतिफ असलमच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले होते.
ताज्या बातमीनुसार,  सलमानने पुन्हा एकदा अरिजीतला बाहेरचा रस्ता दाखवत, ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ या आगामी चित्रपटातील त्याचे गाणे काढून टाकले आहे.
‘वेलकम टू न्यूयॉर्क’ या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा लीड रोलमध्ये आहे. सलमान यात कॅमिओ करताना दिसणार आहे. याच चित्रपटातील एक गाणे अरिजीतच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले होते. मात्र सलमानने अरिजीतचे गाणे नसेल तरच मी कॅमिओ करणार, अशी अट ठेवली. त्याची ही अट मान्य करत, मेकर्सने  संबंधित गाणे फतेह अली खान यांच्या आवाजात नव्याने रेकॉर्ड केले. 

ALSO READ : Video Viral​: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाता गाता संतापला अरिजीत सिंह ! तोंडातून निघाली शिवी!!

एका अवार्ड शोमध्ये सलमान आणि अरिजीत यांच्यात बिनसले होते. हा अवार्ड शो सलमान होस्ट करत होता. या शोमध्ये अरिजीतला पुरस्कार जाहीर झाला आणि सलमानने अरिजीतच्या नावाचा पुकारा केला. पण पुकारा झाल्यानंतर अरिजीत बºयाच वेळानंतर स्टेजवर आला. त्यावेळी त्याच्या पायात चप्पल होती, केस विस्कटलेले होते. स्टेजवर पोहोचताच, तू विजेता आहेस? असा खोचक प्रश्न सलमानने अरिजीतला केला होता. यावर अरिजीतनेही तुम्हीचं मला झोपवले, बसल्या बसल्या माझा डोळा लागला, असे सांगत सलमानला डिवचले होते. तेव्हापासून सलमान अरिजीतवर नाराज आहे. यानंतर सलमानने ‘सुल्तान’मधील अरिजीतने गायलेले ‘जग घुमेया’ हे गाणे हटवले होते. अरिजीतने यानंतर सोशल मीडियावर सलमानची माफी मागणारी पोस्टही टाकली होती. अर्थात यानंतर काहीच क्षणात ही पोस्ट डिलिटही केली होती. पण कदाचित याऊपरही सलमानने अरिजीतला माफ केलेले नाही.

Web Title: Salman Khan has not forgotten 'he' insults! Ariji Singh again showed the exit road !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.