​ सलमान खानने ‘दबंग3’बद्दल केले हे तीन मोठ्ठे खुलासे! तुम्हीही वाचा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 07:19 AM2017-12-11T07:19:36+5:302017-12-11T12:49:36+5:30

सलमान खानची ‘दबंग’ सीरिज प्रेक्षकांच्या मनाच्या अगदी जवळ आहे. याचे एकमेव कारण म्हणजे भाईजान आहे. आत्तापर्यंत या सीरिजचे दोन ...

Salman Khan has made three big disclosures about 'Dabang3'! You also read !! | ​ सलमान खानने ‘दबंग3’बद्दल केले हे तीन मोठ्ठे खुलासे! तुम्हीही वाचा!!

​ सलमान खानने ‘दबंग3’बद्दल केले हे तीन मोठ्ठे खुलासे! तुम्हीही वाचा!!

googlenewsNext
मान खानची ‘दबंग’ सीरिज प्रेक्षकांच्या मनाच्या अगदी जवळ आहे. याचे एकमेव कारण म्हणजे भाईजान आहे. आत्तापर्यंत या सीरिजचे दोन चित्रपट लोकांनी पाहिले आणि हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झालेत. आता या सीरिजचा तिसरा पार्ट प्रेक्षकांसमोर येणार आहे. होय, ‘रेस3’ हातावेगळा केल्यानंतर सलमान खान ‘दबंग3’चे शूटींग सुरु करणार आहे. प्रभुदेवा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.

सध्या सलमान खान ‘द बँग टूर’वर दिल्लीला गेला आहे. यावेळी बोलताना सलमानने ‘दबंग3’बद्दल तीन महत्त्वाचे खुलासे केलेत. हे तिन्ही खुलासे ऐकून ‘दबंग’ सीरिजवर प्रेम करणाºयांच्या आनंदात भर घातलीत, हे नक्की. सलमानने पहिला खुलासा केला ते ‘दबंग3’ कसा चित्रपट असेल याबद्दल. ‘दबंग3’ हा चित्रपट आधीच्या दोन भागांपेक्षा प्रचंड मोठा असणार आहे. व्यापक रूपात तो बनवला जाईल, असे त्याने सांगितले. आता या चित्रपटाचे शूटींग कधी सुरु होणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सलमानने याचेही उत्तर दिलेयं. येत्या मार्चपर्यंत ‘दबंग3’चे शूटींग पूर्ण होईल,अशी आशा असल्याचे त्याने सांगितले. आता तिसरा खुलासा आहे तो सोनाक्षी सिन्हा हिच्याबद्दलचा. ‘दबंग3’मध्ये सोनाक्षी असणार की नाही, अशी चर्चा गत काळात रंगली होती. सलमानने या चर्चेला पूर्णविराम दिला. ‘दबंग3’मध्ये सोनाक्षीही दिसणार, हे सलमानने स्पष्ट केले.

ALSO READ : ​सलमान खानने तोडली किसींग सीन न देण्याची शपथ? कॅटरिना कैफसोबत केले लिप लॉक??

सध्या ‘टायगर जिंदा है’मुळे सलमान चर्चेत आहे. ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. सलमान व कॅटरिना कैफचा ‘एक था टायगर’ हा चित्रपट कबीर खानने  दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट तुफान गाजला होता.  पण ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट कबीरऐवजी अली अब्बास जफर दिग्दर्शित करतो आहे.  ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट यशराज बॅनरचा आत्तापर्यंचा सर्वात महागडा चित्रपट आहे. या चित्रपटाचे बजेट आहे १४० कोटी. 

Web Title: Salman Khan has made three big disclosures about 'Dabang3'! You also read !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.