हा अभिनेता आजारी पडल्यामुळेच सलमान खानला मिळाला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 13:51 IST2017-12-22T08:21:10+5:302017-12-22T13:51:10+5:30
सलमान खानने आज एक अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडचा दबंग खान म्हणून त्याला ओळखले ...

हा अभिनेता आजारी पडल्यामुळेच सलमान खानला मिळाला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक
स मान खानने आज एक अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडचा दबंग खान म्हणून त्याला ओळखले जाते. त्याने आजवर दबंग, रेडी, हम आपके है कौन, हम साथ साथ है, मैंने प्यार किया, एक था टायगर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सलमानने बिवी होतो ऐसी या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण या चित्रपटातील त्याची भूमिका ही साहाय्यक अभिनेत्याची होती आणि त्यातही या चित्रपटाची कथा ही रेखा, कादर खान, बिंदू आणि फारुक शेख या मुख्य कलाकारांभोवतीच फिरत होती. त्यामुळे या चित्रपटातील सलमान प्रेक्षकांच्या लक्षात देखील राहिला नव्हता. त्यामुळे सलमान एका चांगल्या भूमिकेच्या शोधात होता.
सुरज बडजात्या यांनी मैंने प्यार किया या चित्रपटासाठी अनेक नवीन चेहऱ्यांचे ऑडिशन घेतले होते आणि यातून फराज खानची निवड करण्यात आली होती. चित्रपटासाठी फराजला साइन करण्यात आले आणि चित्रपटाच्या चित्रीकरणाची तारीखदेखील ठरली. पण ऐनवेळी फराज खूप आजारी पडला. चित्रीकरण करणे त्याला शक्यच नव्हते. त्यामुळे सुरज बडजात्या प्रचंड टेन्शनमध्ये आले. फराज प्रेम या भूमिकेसाठी योग्य आहे या मतावरच सुरज ठाम होते. पण फराजची तब्येत सुधारत नसल्याने त्यांनी दुसरा पर्याय शोधायला सुरुवात केली. त्याचवेळी त्यांना काहीजणांनी सलीम खान यांच्या मुलाचे म्हणजेच सलमान खानचे नाव सुचवले. त्यावेळात सलमानदेखील चित्रपटांच्या शोधात होता. सुरज यांना सलमान प्रेम या भूमिकेसाठी योग्य वाटला आणि त्याची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.
![Faraaz Khan]()
फराज खान हा अभिनेता युसूफ खान यांचा मुलगा आहे. युसूफ यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. युसूफ यांनी अमर अकबर एन्थॉनी या चित्रपटात साकारलेली भूमिका खूपच गाजली होती. फराज खानने मैंने प्यार किया या चित्रपटानंतर अनेक वर्षांनी फरेब या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर तो पृथ्वी, मेहंदी, दुल्हन बनू मैं तेरी यांसारख्या चित्रपटात झळकला. पण त्याचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही.
फराज खान मैंने प्यार किया या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी आजारी पडला नसता तर सलमानला कधीच मैंने प्यार किया हा चित्रपट मिळाला नसता आणि सलमान कधीच सुपरस्टार बनला नसता.
Also Read : OMG!! इंटरनेटवर लिक झाला Tiger zinda hai movie...