वाढदिवसालाच सलमान खानला मिळाली वाईट बातमी; गुन्हा झाला दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 21:47 IST2017-12-27T16:16:24+5:302017-12-27T21:47:59+5:30

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या मागील शुक्लकाष्ट पूर्णत: संपले असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. होय, वाढदिवसालाच सलमान खानला अशी ...

Salman Khan gets bad news on birthday only; Failure to file a complaint! | वाढदिवसालाच सलमान खानला मिळाली वाईट बातमी; गुन्हा झाला दाखल!

वाढदिवसालाच सलमान खानला मिळाली वाईट बातमी; गुन्हा झाला दाखल!

लिवूडचा दबंग सलमान खान याच्या मागील शुक्लकाष्ट पूर्णत: संपले असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. होय, वाढदिवसालाच सलमान खानला अशी काही भेट मिळाली जी त्याच्यासह त्याच्या चाहत्यांना अजिबात आवडली नसेल. तुम्हाला कदाचित आठवत असेल की, बिग बॉसच्या ११ व्या सीजनच्या सुरुवातीलाच जुबेर खान नावाच्या एका स्पर्धकाशी सलमानची तू तू मै मै झाली होती. जुबेरचा घरातील उद्धट स्वभाव बघता त्याची सलमानने शोबाहेर हकालपट्टी केली होती.  आता जुबेरने सलमान खानविरोधात लोणावळा न्यायालयांतर्गत येणाºया वडगाव येथे गुन्हा दाखल केला आहे. सलमानवर कलम ५०४ व ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

जेव्हा बिग बॉसचा ११ वा सीजन सुरू झाला तेव्हा जुबेर खानने घरातील सदस्यांशी उद्धट वागताना प्रचंड शिवीगाळ केली होती. जुबेरची घरातील वागणूक सलमानला त्याच्यावरी राग अनावर झाला होता. सलमान जेव्हा विकेण्ड का वारमध्ये आला तेव्हा त्याने जुबेरची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्याचबरोबर सलमानने सर्वांसमोर जुबेरला ‘कुत्ता बना के छोडूंगा’ असे म्हटले होते. तसेच त्याची बिग बॉसच्या घराबाहेर हकालपट्टीही केली होती. दरम्यान, जुबेरने हाच मुद्दा घेऊन सलमान खानवर गुन्हा दाखल केला आहे. 



दरम्यान, सलमान त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा करीत असतानाच गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या आनंदावर काहीसे पाणी फेरले गेले असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. सलमानने त्याचे मित्र आणि बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींना नुकतीच एक पार्टी दिली. पार्टीत कॅटरिनासह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. महेंद्रसिंग धोनी यानेदेखील पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत पार्टीत हजेरी लावली होती. 

Web Title: Salman Khan gets bad news on birthday only; Failure to file a complaint!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.