अखेर सलमान खानला जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 16:02 IST2018-04-07T09:30:26+5:302018-04-07T16:02:04+5:30

काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या सलमानला जामीन मंजूर झाला आहे. सलमानने आपल्या दोन रात्री तुरुंगातच काढल्या. ...

Salman Khan finally granted bail | अखेर सलमान खानला जामीन मंजूर

अखेर सलमान खानला जामीन मंजूर

ळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या सलमानला जामीन मंजूर झाला आहे. सलमानने आपल्या दोन रात्री तुरुंगातच काढल्या. काल रात्री अचानक राजस्थानमधील 87 न्यायाधिशांची बदली झाली आहे. त्यामध्ये सलमानच्या केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांचाही समावेश आहे.त्यामुळं सलमानला आज जामीन मिळणार हे स्पष्टच झाले होते. दोन दिवसांपासून त्याच्या सोबत त्याच्या दोन्ही बहिणी अर्पिता आणि अल्विरा सोबत आहेत. सलमानला भेटायला  प्रिती झिंटा पोहोचली होती. प्रितीने चेहऱ्या लपवण्यासाठी डोक्यावर टोपी घातली होती. जेलमधून बाहेर आल्यावर ती सरळ गाडीत जाऊन बसली आणि हॉटेलच्या दिशेने रवाना झाली. 

१९९८ सालच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने काल गुरूवारी सलमानला दोषी ठरवत, पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली होती. यानंतर जोधपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात सलमानची रवानगी करण्यात आली होती. कालची अख्खी रात्र सलमानने तुरुंगात काढली. ‘हम साथ साथ है’च्या शूटींगदरम्यान सलमान खान आणि इतर आरोपी घोडा फार्म हाऊस येथे थांबले होते. यादरम्यान भवाद गावात २७व२८ सप्टेंबरच्या रात्री त्यांनी काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. यानंतर १ आॅक्टोबर रोजी कांकणी गावात काळवीटांची शिकार केल्याचाही आरोप आहे. काळवीट शिकार प्रकरणात सलमानविरोधात एकूण चार गुन्हे (कांकाणी प्रकरण, घोडा फार्म हाऊस प्रकरण, भवाद प्रकरण, आर्म्स अ‍ॅक्ट प्रकरण)दाखल झाले होते. यापैकी तीन खटले काळवीट शिकारीचे होते तर चौथा आर्म्स अ‍ॅक्टचा होता. गुरुवारी सलमानला शिक्षा ठोठावण्यात आली,ते प्रकरण कांकाणी गावातील आहे. 

सलमान तुरुंगात गेल्याने बॉलिवूडला जवळपास 550 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता होती. सलमान या महिन्यात 'दबंग3'च्या शूटिंगला सुरुवात करणार होता.  मात्र जर सलमान खान तुरुंगात गेला असल्याने  हे सगळे प्लनिंग फिसकटण्याची शक्यता होती मात्र आता तो बाहेर आल्याने या सगळ्या शूटिंगला सुरुवात करेल.  

Web Title: Salman Khan finally granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.