भाईजानचा ‘जबरा फॅन’! ‘भारत’साठी बुक केले अख्खे थिएटर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 10:33 AM2019-06-02T10:33:10+5:302019-06-02T10:35:14+5:30

सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा येत्या ५ जूनल प्रदर्शित होतोय. चित्रपटाचे अ‍ॅडव्हॉन्स बुकिंग सुरु झाले आहे. सलमानच्या या चित्रपटाची जबरदस्त क्रेज पाहायला मिळतेय.

salman khan fan books entire theatre for bharat first day show | भाईजानचा ‘जबरा फॅन’! ‘भारत’साठी बुक केले अख्खे थिएटर!!

भाईजानचा ‘जबरा फॅन’! ‘भारत’साठी बुक केले अख्खे थिएटर!!

googlenewsNext
ठळक मुद्देअली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट ‘ओड टू माय फादर’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे.

सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा येत्या ५ जूनल प्रदर्शित होतोय. चित्रपटाचे अ‍ॅडव्हॉन्स बुकिंग सुरु झाले आहे. सलमानच्या या चित्रपटाची जबरदस्त क्रेज पाहायला मिळतेय. भाईजानच्या ‘भारत’चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला मिळावा, यासाठी चाहते अक्षरश: जीवाचा आटापिटा करताहेत. अशात भाईजानच्या एका चाहत्याने काय करावे, तर बॉलिवूडच्या सुल्तानला पाहण्यासाठी त्याने अख्खे थिएटर बुक केले.

होय, भाईजानचा हा जबरा फॅन नाशिकचा आहे. आशीष सिंघल त्याचे नाव. ‘भारत’चा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहण्यासाठी त्याने नाशिकचे अख्खे चित्रपटगृह बुक केले आहे. सलमान दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सिनेमा घेऊन येतो आणि त्याच्या चित्रपटावर चाहत्यांच्या अक्षरश: उड्या पडतात. गतवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमानचा ‘ट्युबलाईट’ हा सिनेमा रिलीज झाला होता. पण या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. पण यंदा ‘भारत’कडून सलमानला प्रचंड अपेक्षा आहेत. आशीष सिंघलसारखे त्याचे चाहते भाईजानच्या या अपेक्षांवर पाणी फेरणार नाहीत, असे तूर्तास तरी वाटतेय.

‘भारत’ या चित्रपटात सलमान वेगवेगळ्या पाच लूकमध्ये दिसणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट ‘ओड टू माय फादर’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे.  या चित्रपटात सलमान खान आणि कतरीना कैफसोबत जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत. ईदच्या मुहूर्तावर ‘भारत’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.

Web Title: salman khan fan books entire theatre for bharat first day show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.