​सलमान खान नकोच! सूरज पांचोलीला आता हवा रणबीर कपूर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 10:39 IST2017-08-07T05:09:08+5:302017-08-07T10:39:08+5:30

सूरज पांचोलीच्या करिअरमागे कुणाचा हात आहे? तर सलमान खानचा. होय,  सूरजने ‘हिरो’मधून बॉलिवूड डेब्यू केले होते. ( हा चित्रपट ...

Salman Khan does not want to Suraj Pancholi now air Ranbir Kapoor !! | ​सलमान खान नकोच! सूरज पांचोलीला आता हवा रणबीर कपूर!!

​सलमान खान नकोच! सूरज पांचोलीला आता हवा रणबीर कपूर!!

रज पांचोलीच्या करिअरमागे कुणाचा हात आहे? तर सलमान खानचा. होय,  सूरजने ‘हिरो’मधून बॉलिवूड डेब्यू केले होते. ( हा चित्रपट जॅकी श्रॉफ यांच्या ‘हिरो’ या गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक होता.)  यामागे सलमान खानची पुण्याई होती. पण सलमानची ही पुण्याई सूरजच्या फार कामी आली नाही. कारण ‘हिरो’ दणकून आपटला. त्याचमुळे सूरज आजही आपल्या पुढील चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा करतो. केवळ प्रतीक्षाच नाही तर, सलमानला सोडून सूरज बॉलिवूडच्या दुसºया कंपूत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.



होय, हा कंपू आहे रणबीर कपूरचा. रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर, वरूण धवन, अर्जुन कपूर हे सगळे बॉलिवूडच्या एका कंपूचा भाग आहेत. हे सगळे एकत्र फुटबॉल खेळतात. आता सूरजलाही या कंपूत सामील होण्याचे वेध लागले आहेत. यामागे सूरजची दूरदृष्टी आहे. आता ही दूरदृष्टी काय, याचा अंदाज तुम्हीही बांधू शकता. बॉलिवूडच्या या यंग अ‍ॅण्ड हॅण्डसम गँगमध्ये प्रवेश म्हणजे, प्रसिद्धी आणि लोकप्रीयता. करिअरच्या या टप्प्यावर सूरज नेमके हेच हवे आहे. त्याचमुळे ही गँग जॉईन करून लाईमलाईटमध्ये येण्याचे सूरजचे प्रयत्न आहेत. अर्थात रणबीर व या गँगच्या अन्य सदस्य सूरजला आपल्यासोबत घेतील का? हा खरा प्रश्न आहे. सूरज हा सलमान खानचा ‘प्रॉडक्ट’ आहे. त्यामुळे साहजिकच रणबीर कपूर त्याला आपल्या टीममध्ये घेत असेल तर  ते ‘भाई’ची नाराजी ओढवून घेण्यासारखे आहे. ‘भाई’ची नाराजी ओढवून घेणे, कुणाला परवडणारे आहे. त्यामुळे सूरजच्या प्रयत्नांना किती यश येते, ते आपण बघूच. तोपर्यंत जस्ट कूल!!

Web Title: Salman Khan does not want to Suraj Pancholi now air Ranbir Kapoor !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.