सलमान खानला का आवडला नाही ‘संजू’तील रणबीर कपूरचा अभिनय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 14:36 IST2018-06-07T09:06:44+5:302018-06-07T14:36:44+5:30

सध्या सगळीकडे संजय दत्तचे बायोपिक ‘संजू’चीच चर्चा आहे. रणबीर कपूरने यात साकारलेल्या संजय दत्तच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. ...

Salman Khan does not like Ranbir Kapoor acting in 'Sanju'? | सलमान खानला का आवडला नाही ‘संजू’तील रणबीर कपूरचा अभिनय?

सलमान खानला का आवडला नाही ‘संजू’तील रणबीर कपूरचा अभिनय?

्या सगळीकडे संजय दत्तचे बायोपिक ‘संजू’चीच चर्चा आहे. रणबीर कपूरने यात साकारलेल्या संजय दत्तच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. ‘संजू’चा ट्रेलर पाहिल्यानंतर तर अनेकांनी रणबीरची प्रशंसा केली आहे. रणबीर अगदी हुबेहुब संजय दत्त भासत असल्याची प्रतिक्रियाही अनेकांनी दिली आहे. पण बॉलिवूडच्या एका सुपरस्टारचे मत कदाचित वेगळे आहे. होय, हा सुपरस्टार म्हणजे सलमान खान.  ‘संजू’मधील रणबीरचा अभिनय सलमानला तरी भावलेला दिसत नाही. आता आम्ही हे कशावरून म्हणतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हे आम्ही नाही, तर खुद्द सलमाननेचं म्हटले आहे. अर्थात थेटपणे नव्हे तर  ‘इशारों इशारों में’. मी  ‘संजू’चा ट्रेलर पाहिला़ माझ्या मते,  ‘संजू’तील गत ८ ते १० वर्षांची भूमिका स्वत: संजय दत्तनेच करायला हवी होती, असे सलमान ‘रेस३’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये बोलला.  
तुझ्या वयात अमिताभ, अनिल कपूर अशा अभिनेत्यांनी चरित्र भूमिका साकारणे सुरू केले होते. तू अद्यापही हिरोच्याच भूमिका साकारतो आहेस, याबाबत सलमानला प्रश्न केला गेला. यावर उत्तर देताना सलमान म्हणाला की, केवळ मीच नाही तर अक्षय कुमार, आमिर खान, शाहरूख खान हेही हेच करताहेत. संजय दत्तही हे करू शकतो. स्वत:च्या बायोपिकमध्ये त्याने स्वत:चं स्वत:ची भूमिका साकारायला हवी होती. माझ्या मते, अन्य कुणी त्याच्या भूमिकेला न्याय देऊ शकत नाही. किमान या बायोपिकमधील गत ८ ते १० वर्षांतील संजय त्याने स्वत:चा पडद्यावर उभा करायला हवा होता.  

ALSO READ : ​ ‘संजू’वर टीका करणा-यास ऋषी कपूर यांनी घातल्या शिव्या, कॉमेडियन अदिती मित्तलने विचारला जाब!!

आता सलमान असे का बोलला, हे आम्हाला ठाऊक नाही. पण सलमान जे काही बोलला, त्यावरून तरी त्याला  ‘संजू’मधील रणबीरचा परफॉर्मन्स फार आवडला असे दिसत नाही. 
खरे तर सलमानला रणबीरचा परफॉर्मन्स आवडला नाही, याला तशी अनेक कारणे आहेत. सलमानला रणबीर जराही आवडत नाही, हेही सगळ्यांनाच ठाऊक आहे आता याचे कारण काय, हे आम्ही नव्याने सांगण्याची गरज नाही. या नाराजीचे तार थेट कॅटरिनाशी जुळलेले आहेत, एवढेच आम्ही सांगू.
 

Web Title: Salman Khan does not like Ranbir Kapoor acting in 'Sanju'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.